Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: 'काम बंद'ची नोटीस, तरी काम सुरूच; खाेला पंचायतीत पंचाकडूनच अवैध बांधकाम, ग्रामस्थांचा आरोप

panchayat issues: पंचायतीने या काम बंदची नोटीस बजावून ७ दिवसांत स्‍पष्‍टीकरण द्या, असा आदेश पागी यांना दिला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: खोल पंचायत क्षेत्रातील १०७/१७ या सर्व्‍हे क्रमांकाच्‍या जागेत याच पंचायतीचे पंचसदस्‍य अजय विठोबा पागी यांच्‍याकडून बेकायदा बांधकाम चालू असल्‍याची तक्रार श्रीनिवास पुरुषोत्तम नायक यांनी केल्‍यानंतर १९ सप्‍टेंबर रोजी पंचायतीने या काम बंदची नोटीस बजावून ७ दिवसांत स्‍पष्‍टीकरण द्या, असा आदेश पागी यांना दिला होता.

हा आदेश जारी करून महिना उलटूनही पंचायतीकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. अद्यापही हे अवैध बांधकाम चालू आहे, असा दावा नायक यांनी केला आहे.

यासंदर्भात तक्रारदार नायक यांनी माहिती हक्‍क कायद्याखाली माहिती मागवली होती. ३ सप्‍टेंबर रोजी त्‍यांना दिलेल्‍या माहितीत सदर बांधकाम अजय विठोबा पागी आणि तेजल अजय पागी यांच्‍या मालकीच्‍या जागेत असून या जागेत कुठलेही बांधकाम उभारण्‍यास पंचायतीने कसलाही परवाना दिलेला नाही, हे स्‍पष्‍ट केले आहे.

अजय पागी व तेजल पागी यांना परवाना देण्‍याचा कुठलाही ठराव पंचायतीने पास केलेला नाही, असेही म्‍हटले होते. याच संदर्भात दाखल केलेल्‍या आणखी एका आरटीआय अर्जाला ३० सप्‍टेंबर रोजी उत्तर देताना, सदर बांधकाम हे बेकायदेशीर असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर पंचायतीने ते बंद करण्‍यासाठी नोटीस जारी केली आहे, असे उत्तर देण्‍यात आले आहे.

पंचायतीचा बांधकाम परवाना नसल्याचा आरोप

वाघण-तळप या जागेवर हा दुमजली बंगला उभारला जात असून हे बांधकाम करताना त्‍यासाठी आवश्‍‍यक असलेले तांत्रिक परवाना, कन्‍वर्झन सनद तसेच हे बांधकाम करण्‍यासाठी पंचायतीकडून कुठलाही परवाना घेतला नसल्‍याचे या तक्रारीत म्‍हटले आहे.

ज्‍या पंच सदस्‍याकडून हे बांधकाम केले जाते, त्‍यांचीच पत्‍नी या पंचायतीत सध्‍या उपसरपंच म्‍हणून काम करत आहे. यामुळेच याबाबतीत पंचायतीकडून चालढकल होत असल्‍याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT