illegal Construction At st inez panaji Sandip Desai
गोवा

Panaji News: महानगरपालिकेची नोटीस फाडून बेकायदा पद्‍धतीने इमारतीचे बांधकाम सुरु; सांतिनेजमधील प्रकार

महापालिका गप्प : इमारत मालकाकडून कायद्याला बगल

दैनिक गोमन्तक

Corporation Of The City Of Panaji: सांतिनेजमधील ‘वाय’ मार्गावरील शीतल हॉटेलशेजारी रस्ता रुंदीकरणात गेलेल्या आणि महानगरपालिकेचा परवाना नसलेल्या एका दुकानाच्या मालकाने सर्व कायद्यांना कोलदांडा दाखविला आहे.

महानगरपालिकेने काम थांबविण्याचे आदेश दिलेली नोटीस फाडून या दुकानमालकाने नूतनीकरणाचे काम दांडगाईने सुरू केले आहे.

महानगरपालिका रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी धावत असते; पण बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाही.

महागरपालिकेने पाठविलेल्या निरीक्षकालाही हा मालक आता जुमानत नाही. सर्व नियम आणि कायदे फक्त गरिबांसाठी असतात, ते उगाच म्हणत नाहीत. या इमारत मालकाला राजकीय वरदहस्त असल्याने तो महापालिकेचेही ऐकत नसल्याचे स्पष्ट आहे.

विशेष बाब म्हणजे ही जागा रस्ता रुंदीकरणात गेलेली आहे, त्याचवेळी महापालिकेने कारवाई करून तो रस्ता रुंद करायला हवा होता. परंतु आता त्याच्यासाठी म्हणे आहे तसाच मार्ग ठेवण्यासाठी काहीजण राजकीय स्तरावरून प्रयत्न करीत आहेत.

नगरसेवकाची भूमिका संशयास्पद

महानगरपालिकेच्या बोटचेपेपणामुळे असे धनदांडगे कायद्याला जुमानत नाहीत. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, असा संदेश महानगरपालिका देतेय असे वाटते.

विशेष बाब म्हणजे एकही नगरसेवक या बेकायदा बांधकामाबाबत गेल्या बैठकांमध्ये बोललेला नाही. त्यामुळे ज्या नगरसेवकाच्या प्रभागात हे काम सुरू आहे, त्या नगरसेवकाची भूमिकाही संशयास्पद वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT