Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: गोव्यातील बेकायदेशीर कॅसिनो बंद करणार; विरोधकांनी घेरल्यानंतर CM सावंतांचे आश्वासन

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: जमिनीवरील कॅसिनोकडून सरकारला 349 कोटी रुपयांचे महसूल येणे बाकी असल्याचेही सरदेसाईंनी सांगितले.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात सुरु असणाऱ्या अवैध कॅसिनोवरुन विधानसभा पावसाळी अधिवेशनात घमासान झाले. आमदार विजय सरदेसाईंनी गोव्यात अवैध पद्धतीने सुरु असलेल्या कॅसिनोबाबत प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अवैध कॅसिनोंवर कारवाई करण्याचे आश्वासन देत, सरकारला युवावर्गच महत्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

गोव्यात मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने कॅसिनो सुरु असल्याचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तसेच, अनेक ठिकाणी कॅसिनोची जाहिरात करणारे फलक लावल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाय जमिनीवरील कॅसिनोकडून सरकारला 349 कोटी रुपयांचे महसूल येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना राज्यातील विविध भागांत बेकायदेशीररीत्या सुरु असलेले कॅसिनो बंद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले. तसेच, बेकायदा होर्डिंग्जवर राज्य सरकारची कारवाई सुरु आहे. तसेच, सरकारला महसूल मिळणार नाही अशा जाहिरातींचे होर्डिंग्ज राज्यात झळकावू देणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कॅसिनोंकडून 349 कोटी 89 लाख 63 हजार 5 रूपये राज्याला येणे बाकी. ही रक्कम सरकार कधी वसूल करणार? असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना येत्या वर्षभरात सर्व रक्कम सरकार वसूल केली जाईल, जे कॅसिनो रक्कम भरणार नाहीत त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

न्यायालयीन आदेशानूसार इतर होर्डिंग्ज झाकलेली असताना, मुंबई उच्च न्यायालय प्रकल्पापासून काही मीटर अंतरावर मांडवी नदीच्या पलीकडे असलेले 'मॅजेस्टिक प्राइड' हे होर्डिंग पाडण्याचे धाडस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करतील का? सदर होर्डिंग उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सरसकट उल्लंघन आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT