गोव्यात सायबर ठगांचा सुळसुळाट; 23 कोटींचा गंडा, पाच वर्षात 260 गुन्हे नोंद

Cyber Scam : सात महिन्‍यांतच ११ कोटींचा चुना; आर्थिक गंडा घालण्‍याबरोबरच कित्‍येक मुलींचे वाईट पद्धतीचे फोटो समाज माध्‍यमावर घालून त्‍यांना बदनाम करण्‍याचे प्रकार घडले आहेत.
गोव्यात सायबर ठगांचा सुळसुळाट; 23 कोटींचा गंडा, पाच वर्षात 260 गुन्हे नोंद
Cyber Scam Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, सध्‍या फोंड्यात ॲपद्वारे गुंतवणूक करून शेकडो गुंतवणूकदार अडचणीत आलेले असताना गेल्या पाच वर्षात गोमंतकीयांना सायबर ठगांकडून तब्‍बल २३ कोटींचा फटका बसला आहे.

२०१९ ते आतापर्यंत गोवा सायबर गुन्‍हे विभागाकडे अशा प्रकारचे १६० गुन्‍हे नोंद झाले आहेत. वेगवेगळ्‍या प्रकारची गुंतवणूक, सेवा खंडित झाल्‍याचे सांगून ओटीपी मागून घेणे, कोटींचे बक्षीस लागल्‍याचे सांगून ती रक्‍कम सोडविण्‍यासाठी पैशांची भरणा करा, असे सांगून तसेच अन्‍य प्रकारे या ठगांनी गोमंतकीयांना चुना लावला आहे.

यातील सर्वांत धक्‍कादायक बाब अशी की, यातील पन्नास टक्‍के गुन्‍हे या २०२४ च्‍या पहिल्‍या सहा महिन्‍यात घडले असून या सहा महिन्‍यातच गोवेकरांना सायबर गुन्‍हेगारांकडून ११.५० कोटींचा गंडा बसला आहे, अशी माहिती सायबर गुन्‍हे विभाग पोलिसांकडून प्राप्‍त झाली आहे. सध्‍या फोंड्यात मोबाईल ॲपद्वारे जो गंडा घालण्यात आला आहे, त्यातील रक्‍कम काही कोटींच्‍या घरात असून त्‍यात काही निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही हा गंडा बसला आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्‍टरला असाच ९० लाखांचा गंडा बसला होता. स्‍टॉक मार्केटमध्‍ये पैशांची गुंतवणूक करून रक्कम वाढवून देण्‍याच्‍या बहाण्‍याने या महिला डॉक्‍टरला लुटले होते. समाज माध्यमावरून एक लिंक पाठवून तिला या सायबर गुन्‍हेगारांनी आपल्‍या जाळ्‍यात ओढले होते.

पणजीमधील एका सराफाला खोटा ट्रेडिंग अकाऊंटमध्‍ये गुंतवणूक करायला लावून तब्‍बल २.५० कोटींचा गंडा घातला होता. सायबर पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, या सायबर गुन्‍हेगारांच्‍या जाळ्यात डॉक्‍टर, अभियंते, व्‍यावसायिक हे पडत असून अधिक परतावा देण्‍याचे आमिष दाखवून त्‍यांना लुटण्‍यात येत आहे. अधिक परताव्‍याच्‍या लालचेतून गोव्यातील व्‍यावसायिक किमान सात कोटी रुपये गमावून बसले आहेत, अशी माहिती सायबर विभागाने दिली.

हल्‍लीच सायबर विभागाने अशा प्रकारचे दोन गुन्‍हे नोंद केले आहेत, त्‍यात एका गुन्‍ह्यात पणजीतील एका कंपनीच्‍या कार्यकारी अध्‍यक्षाचा ईमेल हॅक करून कंपनीच्‍या खात्‍यातील दीड कोटी रुपये लांबवले होते. तर आणखी एका कंपनीला असेच ४० लाखांचा गंडा बसला होता.

गोव्यात सायबर ठगांचा सुळसुळाट; 23 कोटींचा गंडा, पाच वर्षात 260 गुन्हे नोंद
Goa Police: अब तक १०४! साडेचार वर्षांत निलंबित पोलिसांची आकडेवारी; ही आहेत कारणे

पैशांसाठी ‘बहाणे’!

आर्थिक गंडा घालण्‍याबरोबरच कित्‍येक मुलींचे वाईट पद्धतीचे फोटो समाज माध्‍यमावर घालून त्‍यांना बदनाम करण्‍याचे प्रकार घडले आहेत. त्‍याशिवाय तुमच्‍या मुलांना अटक केली आहे. त्‍यांना सोडविण्‍यासाठी आम्हांला अमुक अमुक रक्‍कम द्या, असे सांगूनही गोव्‍यातील काही जणांना लुटण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. सर्वसामान्यांनी लुटण्यासाठी विविध ‘बहाणे’ सायबर ठगांकडून करण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com