Colva Bungalow Demolition Dainik Gomantak
गोवा

CRZ Goa: कोलव्‍यात सीआरझेड कायद्याचा भंग; व्‍यावसायिकाचा बंगला भुईसपाट

Colva Bungalow Demolition: गोवा किनारपट्टी प्राधिकरणाने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये हे बांधकाम पाडण्‍याचा आदेश दिला होता

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सीआरझेड कायद्याचा भंग करून कोलवा समुद्रकिनाऱ्याजवळ पवनकुमार अरोरा या दिल्‍लीतील एका व्‍यावसायिकाने उभारलेला बंगला आज बांधकाम हटाव पथकाने भुईसपाट केला. हे बांधकाम विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारले गेले असल्‍याचे नमूद करून गोवा किनारपट्टी प्राधिकरणाने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये हे बांधकाम पाडण्‍याचा आदेश दिला होता.

सासष्‍टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांच्‍या देखरेखीखाली हे बांधकाम पाडण्‍यात आले. उपजिल्‍हाधिकारी कार्यालयातून हे बांधकाम पाडण्‍याचा आदेश देण्‍यात आला होता. त्‍यानुसार ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे गावकर यांनी सांगितले.

या बंगल्‍याच्‍या विरोधात कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी उच्‍च न्‍यायालयात तक्रार दाखल केली हाेती. त्‍यानंतर न्‍यायालयाने किनारपट्टी प्राधिकरणाला या प्रकरणावर सुनावणी घेण्‍यास सांगितले होते. सुनावणीच्‍यावेळी हे बांधकाम समुद्राच्‍या भरती रेषेपासून २०० मीटर अंतरात असल्‍याचे दिसून आल्‍यावर ते पाडण्‍याचा आदेश देण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT