Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Trafficking: 500 किलो गोमांसासह 4 जण अटकेत! बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा गोवा पोलिसांकडून पर्दाफाश

500 KG Beef Seized In Goa: पोलिसांना केरी चेकपोस्टवर पहाटेच्यादरम्यान बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

Manish Jadhav

Illegal Beef Transport Seized At Keri sattari Checkpost Four Arrested

सत्तरी: राज्यात गेल्या काही दिवसांत बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याच बेकायदेशीर गोमांसाच्या वाहतूकीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहे. यातच आता, वाळपई पोलिसांनी गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी मुद्देमालासह चार जणांच्या मुसक्या आवळल्या.

500 किलो गोमांसासह चार जण अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना केरी चेकपोस्टवर पहाटेच्यादरम्यान बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी करत कारवाई चार जणांना अटक केली. अमानली हुसेनसाब देसाई (वय वर्ष 23), सय्यद (वय, वर्ष 29) सोहेल (वय, वर्ष 28) आणि इरफान (वय, वर्ष 23) अशी अटक केलेल्या संशियतांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 वाहनांसह 500 किलो गोमांस जप्त केले. पोलिसांनी जप्त केलेल्या या गोमांसाची बाजारभावानुसार किंमत 2,27,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पुढील तपास सुरु

तसेच, पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये निळ्या रंगाची हुंदाई कार (GA-03-Y-7867) आणि सिल्व्हर रंगाची टोयोटा (GA-05-B-9993) आहे. वाळपई (Valpoi) पोलिस ठाण्यात गोवा प्राणी संरक्षण कायद्याच्या (19995) कलम 8 अंतर्गत अटक करण्यात आलेल्या संशियतांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक जिवबा दळवी आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT