IIT Goa Protest in Sanguem  Dainik Gomantak
गोवा

IIT Goa : आयआयटीवरून उगेवासीय संभ्रमात, धाकधूक वाढली!

सांगेतच अन्‍य पर्याय शोधणार असल्याचं मंत्री सुभाष फळदेसाई यांचे सुतोवाच

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa : कोठार्ली भागात आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्‍प होऊ शकत नाही, असे पत्र केंद्राकडून प्राप्‍त झाल्‍याचे स्थानिक शेतकऱ्यांंनी सांगितले आहे. मात्र, मंत्री सुभाष फळदेसाईंनी माघार न घेता सांगेतच आयआयटी होणार, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्‍या प्रशासकीय हालचाली पाहता आयआयटीसाठी उगे येथील जागेचा पर्याय म्‍हणून वापर होऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. त्‍यामुळे उगेवासीय धास्‍तावले आहेत.

सांगेचे आमदार सुभाष फळदेसाईंचा आग्रह आहे, की प्रकल्प सांगेमध्येच व्हावा. ही बाब पाहता आयआयटीची पुढील नियोजित जागा उगे येथे असू शकते, असा अंदाज आहे. याची कुणकुण लागताच महिनाभर आधीच उगेवासीयांनी प्रकल्पविरोधात सभा घेऊन आपला इरादा स्पष्ट केला होता.

व्हर्टिकल बांधकामाचा पर्याय

30 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कौशल्यविकास, माहिती व तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर हे गोव्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आयआयटी प्रकल्पासाठी मोठी जमीन उपलब्ध नसल्यास उभ्या पद्धतीने (व्हर्टिकल) बांधकाम करून कमी जागेत तो उभारला जाऊ शकतो का? यावर विचार होऊ शकतो, असे सांगितले होते. पर्यावरण सांभाळून हा प्रकल्प उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

... म्‍हणून उगेत शक्‍यता अधिक

आयआयटीसाठी यापूर्वीच उगे येथील जमिनीची पहाणी करण्यात आली होती. एकाच सर्व्हे क्रमांकावर सुमारे 15 लाख चौरस जमीन असलेला 1/14 उताऱ्याचा कागद उगेतील अनेक नागरिकांकडे आहे. त्यामुळे राज्य सरकार आता उगे येथे आयआयटी प्रकल्प उभारण्यास प्रयत्नशील राहिल, असा अंदाज आहे. शिवाय रिवण येथील जागेचाही विचार होऊ शकतो, असेही समजते.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने कोठार्लीतील जागा आयआयटीसाठी योग्य नसल्याचे सांगितले आहे. तरी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा प्रकल्प सांगेतच होईल, अशी भुमिका कायम ठेवली आहे. ‘आमच्याकडे प्लॅन ‘बी’ आणि ‘सी’ तयार आहे. त्यामुळे आम्ही सांगेतच मात्र नव्या जागेवर प्रकल्प उभा करू’, असे त्यांनी सांगितले.

या अगोदर सीमांकित करून अहवाल तयार केलेली जागा केंद्राच्या शिक्षण खात्याला मंजूर नसेल तर आम्ही दुसरी जागा विकत घेऊन या प्रकल्पासाठी देऊ. यासाठी आमचे इतर प्लॅन तयार आहेत, असे सांगत आयआयटी सांगेमध्येच होणार, अशी आग्रही भूमिका घेत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गरज पडल्यास खासगी जागा विकत घेऊ, त्यासाठी चार ठिकाणचे पर्याय उपलब्ध असल्याचे माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT