Goa Agriculture: कृषी पुरस्कार प्राप्त शेखर पराष्टेकरांची आदर्श कामगिरी; 'सेंद्रिय पद्धतीने हरित क्रांती'
Dainik Gomantak

Goa Agriculture: कृषी पुरस्कार प्राप्त शेखर पराष्टेकरांची आदर्श कामगिरी; 'सेंद्रिय पद्धतीने हरित क्रांती'

Goa Agriculture: शेखर पराष्टेकर यांनी आपल्या शेती-बागायतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करुन हरित क्रांती घडवली आहे.
Published on

Goa Agriculture: पराष्टे येथील शेखर पराष्टेकर यांनी आपल्या शेती-बागायतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून हरित क्रांती घडवली आहे. त्यांना यंदाचा कृषी खात्याचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नवचेतना युवक संघ आणि शाहू, फुले, आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्याच बागायतीत गौरव करण्यात आला.

यावेळी उद्योजक मनोहर तळवणेकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, शाहू, फुले, आंबेडकर प्रतिष्ठानचे महादेव गवंडी, नाट्यकलाकार सुचिता शिरोडकर, वेरोनिका डि सिल्वा, मानसी शिरोडकर, शिला पराष्टेकर, अश्विनी पराष्टेकर आदी उपस्थित होते.

सुपारीचे वेस्टेज, घरातील ओला कचरा व अन्य साहित्यातून त्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्यांनी घराशेजारी म्हशींसाठी गोठा बांधला आहे. त्यांच्याकडे दहा म्हशी आहेत. त्यांचे शेणही गांडूळ खत निर्मितीसाठी मिळते. या प्रकल्पासाठी प्रगतीशील शेतकरी उदय प्रभुदेसाई तसेच कृषी खात्याचे अधिकारी प्रसाद परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले, असे पराष्टेकर यांनी सांगितले.

Goa Agriculture: कृषी पुरस्कार प्राप्त शेखर पराष्टेकरांची आदर्श कामगिरी; 'सेंद्रिय पद्धतीने हरित क्रांती'
Goa Liberation Day: 'रक्त न सांडता गोवा मुक्त झाला नाही' गोवा मुक्तीच्या विलंबाचा अभ्यास करा- सुशीला मेंडिस

कृष्णा पालयेकर, अध्यक्ष, नवचेतना युवक संघ-

गांडूळ खत तसेच सेंद्रिय खताची मागणी सध्या वाढत असून ती आणखी वाढणार आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी भांडवलात करता येतो. पराष्टेकरांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करून बेरोजगार युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com