Ramadan food guide Dainik Gomantak
गोवा

Iftaar Food: रमजान स्पेशल इफ्तार मेनू; मित्र-परिवारासोबत गोव्यात असाल तर 'या' 5 पदार्थांचा आस्वाद घ्या!

Iftar food Goa: इफ्तारची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असली, तरी स्वादिष्ट खाद्यपदार्थ हे या परंपरेचे केंद्रस्थान आहेत

Akshata Chhatre

Best Iftar Meals Goa: रमजानचा पवित्र महिना म्हणजे उपवास आणि भक्तीचा काळ. दिवसभर अन्न-पाण्याशिवाय उपवास केल्यानंतर सायंकाळी इफ्तारच्या वेळी मनसोक्त जेवणाचा आनंद काही औरच असतो. प्रेषित मुहम्मद यांनी खजूर खाऊन उपवास सोडण्याचे महत्त्व सांगितले होते, आणि तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे. इफ्तारची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असली, तरी स्वादिष्ट खाद्यपदार्थ हे या परंपरेचे केंद्रस्थान आहेत.

रमजान आणि इफ्तार म्हणजे मित्र-परिवारासोबत एकत्र येऊन जेवणाचा आनंद लुटण्याची संधी. इफ्तारच्या वेळी मित्र-परिवारासोबत 'या' पाच पदार्थांचा आस्वाद घेतल्यास रमजानचा आनंद द्विगुणित होतो.

कबाब: चिकन किंवा मटणाच्या खिम्यापासून तयार होणारा हा पदार्थ स्टार्टर म्हणून उत्तम आहे. खिमा मिक्सरमध्ये बारीक करून त्यात मसाले मिसळून मॅरीनेट करतात. नंतर कबाबला हवा तो आकार देऊन ते शॅलो फ्राय करतात. गरम आणि हिरव्या चटणीसोबत कबाब खायला खूपच चविष्ट लागतात.

रशियन कटलेट: बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असणारा हा पदार्थ बोनलेस चिकनपासून तयार केला जातो. चिकन उकडून त्याचे तुकडे करतात. त्यात बटाटे, शिमला मिरची, वाटाणा, गाजर आणि हिरवी मिरची मिसळतात.

मुलांना आवडण्यासाठी काही लोकं त्यात चीजही टाकतात. मैदा आणि शेवयांच्या आवरणाने हे कटलेट तयार करून ते सोनेरी येईंपर्यंत तळतात. हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉससोबत ते खायला खूपच चविष्ट लागतात.

खिमा समोसा: मसालेदार आणि स्मोक्ड खिम्याचे सारण भरून तयार होणारा हा पदार्थ खूपच चविष्ट लागतो. सोनेरी रंग येईपर्यंत तळलेले हे समोसे हिरव्या चटणीसोबत खायला खूपच छान लागतात.

चिकन आणि बीफ रोल्स: भूक शमवण्यासाठी हे रोल्स उत्तम पर्याय आहेत. बीफ आणि चिकन असे दोन प्रकारचे रोल्स उपलब्ध आहेत. कोबी, गाजर आणि मसालेदार बोनलेस मांस यांचे सारण भरून हे रोल्स तयार केले जातात. मैद्याच्या आवरणाने तयार केलेले हे रोल्स शॅलो फ्राय करून हिरव्या चटणीसोबत खायला खूपच छान लागतात.

ॲपल सरबत: दिवसभर उपवास केल्यानंतर तहान भागवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी हे सरबत उत्तम पर्याय आहे. फळांचं सिरप, पाणी आणि भरपूर बर्फ मिसळून हे सरबत तयार केलं जातं. गरज असल्यास त्यात साखर आणि लिंबू मिसळतात.

उपवास सोडणाऱ्यांसाठी इफ्तार म्हणजे एक पर्वणीच असते. पण उपवास न करणारे लोकही आपल्या मित्र-परिवारासोबत जेवणाचा आनंद लुटू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT