Panaji Iftar Party Hotspot: इफ्तार पार्टीसाठी पणजीतील 'हे' ठिकाण हॉटस्पॉट; स्वादिष्ट पदार्थांचा घ्या आस्वाद

Manish Jadhav

गोवा

गोवा जेवढा त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच खाद्यसंस्कृतीसाठी आहे.

Goan Food | Dainik Gomantak

गोव्याची खाद्यसंस्कृती

गोव्यात पर्यटक अस्सल गोवन पदार्थांची चव चाखल्याशिवाय राहू शकत नाही. कोळंबी, बांगडा, सुरमई अशी ताजी मासळी रवा लावून ज्या पद्धतीनं तळली जाते ते पाहून तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाही.

Fish | Dainik Gomantak

रमजान

सध्या रमजानचा महिना सुरु आहे. पणजीतील जामा मशि‍दीचे ठिकाण खाद्यप्रेमींसाठी हॉटस्टॉप बनले आहे.

Chicken | Dainik Gomantak

इफ्तार पार्टी

जामा मशिदीसमोरील फूड स्टॉल प्रत्येकांना आकर्षित करतात. इथे मिळणारे शामी कबाब, चकली कबाब, चिकन समोसा खवय्यांची चव वाढवतात. इफ्तार पार्टीसाठी संध्याकाळी मोठी गर्दी होते.

Chicken Role | Dainik Gomantak

नाश्ता

इफ्तारसाठी चिकन समोसा हा संध्याकाळचा परिपूर्ण नाश्ता आहे. तुम्ही इथला चिकन समोसा नक्की ट्राय केला पाहिजे.

Chicken Samosa | Dainik Gomantak

स्वादिष्ट कबाब

जामा मशि‍दीसमोर मिळणारे विविध कबाब तुम्ही रुमाली रोटीसोबत ट्र्राय केले पाहिजेत. तंदुरी रोटी, चिकन कबाब, चिकन फ्राय असे असंख्य फूड डिश तुम्ही इथे ट्राय करु शकता.

Chicken | Dainik Gomantak

चिकन रोल

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये लोक खासकरुन चिकन रोल खाणे पसंद करतात.

Chicken Role | Dainik Gomantak

रिफ्रेशिंग पेये

गोव्यात सध्या उन्हाची दाहकता वाढली आहे. इथे तुम्ही रिफ्रेशिंग पेये ट्राय करु शकता. फालुदा, आईस्क्रिम, शरबत घेऊ शकता.

Refreshing drinks | Dainik Gomantak
आणखी बघा