Mobile Theater Setup at IFFI Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

Mobile Theater Setup at IFFI: भारतीय प्रेक्षक आणि चित्रपटांचे नाते लक्ष्यात घेता यंदा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मोबाईल थिएटरची नवीन संकल्पना सुरु केली जाणार आहे

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: सध्या गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शव प्रदर्शन सोहळा आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जोरदार चर्चा सुरु आहे. नोव्हेंबरच्या काळात होणाऱ्या या दोन्ही आंतराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमांमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. सर्वांच्या स्वागताची तयारी करण्यात सध्या गोवा गुंतलेला असून दररोज या दोन्ही कार्यक्रमांबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. भारतीय प्रेक्षक आणि चित्रपटांचे नाते लक्ष्यात घेता यंदा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मोबाईल थिएटरची नवीन संकल्पना सुरु केली जाणार आहे.

सर्व चित्रपट प्रेमींना सिनेमाचा लाभ घेता यावा म्हणून नेशनल फिल्म डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी एकत्र येत मोबाईल थिएटरची नवीन संकल्पना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या चित्रपट प्रदर्शनांमध्ये राजमौली यांचा RRR तसेच सत्यजित रे यांच्या अपराजितो सारख्या नामवंत कलाकृतींचा समावेश होणार आहे.

मोबाईल थिएटर म्हणजे काय?

मोबाईल थिएटरला ट्रॅव्हलिंग थिएटर किंवा पोर्टेबल सिनेमा असं देखील म्हटलं जाऊ शकतं. यामध्ये चित्रपटाच्या स्क्रीनची जागा बदलता येऊ शकते. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावेळी फिरत्या चित्रपट प्रदर्शनाला सामील केलं जाणार आहे.

IFFIच्या मैदानावर यावेळी 120 लोकांसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आसनव्यवस्था तयार केली जाईल. तसेच ओपन एअर स्क्रीनचा वापर करून उत्तर तसेच दक्षिण गोव्यात फिरत्या चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. या अनोख्या सेटअपमुळे राज्यातील तसेच विदेशातील चित्रपटप्रेमींना चित्रपट महोत्सवात सहभागी होता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Today's Live Updates Goa: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दीपराज गावकर करणार गोव्याचं नेतृत्व!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT