600 Sky Lanterns to Illuminate Goa During IFFI 2024
पणजी: दिवाळीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी आकाशकंदील स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी प्रत्येक तालुक्यातून ५० आकाशकंदील गोवा मनोरंजन संस्था घेणार असून एकूण ६०० आकाशकंदील इफ्फीच्या काळात गोवा मनोरंजन संस्था ते कला अकादमीपर्यंत लावण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे दयानंद बांदोडकर मार्गाला आकाशकंदिलांचा साज चढणार आहे.
यावेळी गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो, पत्रसूचना कार्यालयाचे संयुक्त सचिव प्रिथुल कुमार आणि रुंदा देसाई यांची उपस्थिती होती. प्रथम आकाशकंदील घेऊन येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. आकाशकंदील घेतल्यावर गोवा मनोरंजन संस्थेतर्फे प्रत्येकाला ५०० रुपये देण्यात येतील. तसेच प्रत्येक तालुक्यात प्रथम तीन बक्षिसे देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शुक्रवारी २२ रोजी संध्याकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत गोवा मनोरंजन संस्था ते कला अकादमीपर्यंत इफ्फी परेड होणार आहे. परेड सुरू होण्याआधी या मार्गावर आकाशकंदील लावण्यात येतील. गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन आणि कलेचे प्रदर्शन याद्वारे करण्याचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
यावर्षी इफ्फित २७० हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यातील १८० हून अधिक चित्रपट हे आंतरराष्ट्रीय असणार आहेत. ५० जागतिक प्रीमियर होणारा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हे सर्व चित्रपट एकूण सहा जागांवर दाखविण्यात येतील.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रूपाने गोमंतकीयांना चांगली संधी मिळत आहे. इफ्फीत आपली नोंदणी करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकापेक्षा एक एकचित्रपट पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ समस्त गोमंतकीयांनी घेतला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.