IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa: कला अकादमी फक्त नावालाच; अपुऱ्या स्क्रीन व विक्रमी नोंदणीमुळे इफ्फीचं नियोजन गंडलं

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 21 नोव्हेंबरपासूनच नोंदणी बंद करण्यात आली आहे.

Pramod Yadav

गोव्यात 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI GOA) सुरूवात झाली आहे. इफ्फी जगभरातील सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर होत असलेल्या इफ्फीसाठी सिनेरसिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असून, याचा थेट इफ्फीच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.

यावर्षी 10,000 सिनेरसिकांनी नोंदणी केली असून, ही आजवरची विक्रमी नोंदणी आहे. यामुळे इफ्फीच्या दुसऱ्याच दिवशी (दि.21) नोंदणी बंद करण्यात आली आहे. तसेच, अपुऱ्या स्क्रीनमुळे सिनेरसिकांची गैरसोय झाली आहे.

माहिती आणि प्रसारण विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दहा हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यात केवळ 40 परदेशी प्रतिनिधी असून, यामध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे.

पर्वरी येथील आयनॉक्सला रेड कार्पेटची सुविधा नसल्याने सध्या पणजीतील आयनॉक्सला (Panaji Inox) हे शो आयोजित केले जात आहेत. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट पर्वरी येथे प्रदर्शित केले जात आहेत. तसेच, कला अकादमी रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याने कला अकादमी वापरात नाही.

कला अकादमी फक्त नावालाच

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कला अकादमी इफ्फीसाठी काही प्रमाणात उपलब्ध असेल असे सांगितले होते. इफ्फीसाठी कला अकादमीला सजावट देखील करण्यात आली आहे. पण, इफ्फीचा कोणताच कार्यक्रम कला अकादमीत आयोजित केला जात नाही. त्यामुळे इफ्फी फक्त नावालाच आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

FTII च्या वतीने अपंग लोकांसाठी आयोजित केलेला अभिनय वर्कशॉप देखील व्हिलचेअर वापरकर्त्यांना वापरता आला नाही. यामुळे हे वर्कशॉप आर्ट गॅलरीत हलविण्यात आले. चार दिवस उलटून गेले तरी कला अकादमीचा इफ्फीसाठी वापर होत नाही. 1000 लोकांची आसन क्षमता असलेली अकादमी उपलब्ध नसल्याने सिनेरसिकांची गैरसोय झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT