55th IFFI 2024 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa: सिनेमा संस्कृती रुजवण्याच्या संधीची गाडी गोव्याकडून सुटली; असं काय घडलं? वाचा सविस्तर

55th IFFI 2024: इफ्फी ही खरे तर गोव्यात सिनेमा संस्कृती रुजवण्याची एक सुंदर संधी होती. मात्र गेली वीस वर्षे ज्या प्रकारे इफ्फीचा उपचार पार पाडला जात आहे ते पाहता या संधीची गाडी कधीच सुटून गेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

इफ्फी या शब्दाचे गारुड अनेकांवर अनेक प्रकारे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारे आणि पुरस्कार मिळवणारे अर्थपूर्ण चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या या चित्रपट महोत्सवाची प्रतीक्षा चित्रपट रसिक, चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, चित्रपट कलाकार अधीरतेने करत असतात पण त्याच बरोबर गोमंतकातील सामान्य जनांना देखील या महोत्सवाचे कुतूहल, त्यातील वेगळ्या वातावरणामुळे नेहमीच वाटत राहिले आहे. 

२००४ यावर्षी जेव्हा इफ्फीची सुरुवात गोव्यात झाली त्यावेळी या महोत्सवासंबंधीच्या 'समज आणि गैरसमजांनी' एक मजेदार वातावरण तयार झाले होते. गोवा सरकारने त्यावेळी ज्या प्रकारे इफ्फीला उत्सवी रूप दिले त्यातून इफ्फी म्हणजे 'फूड अँड म्युझिक' महोत्सव आहे असेही अनेकांना वाटून गेले.

पण आता गेल्या वीस वर्षात इफ्फीबद्दलचे अनेक गैरसमज निवळून हा  'सिनेमा आणि सिनेमा उद्योगा'संबंधी महोत्सव आहे याची जाणीव जवळजवळ सर्वांना झाली आहे. अर्थात महोत्सवाचे ते उत्सवी अतरंगी रूप नाहीसे झाल्याची हळहळ अनेकांना अजूनही (उगाचच) वाटत असते ही बाब अलहिदा.

'त्या पयलीच्या इफ्फीतले आता कायच उरुंक ना....' अशी दुःखद हळहळ व्यक्त होताना अजूनही ऐकू येते. इफ्फीच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला थाटले जाणारे फूड स्टॉल आणि काही ठिकाणी आयोजित होणारे खुल्या जागेतील चित्रपट प्रदर्शने त्या जुन्या उत्सवी महोत्सवाचे काही अवशेष आजही बाकी राहिलेले असले तरी त्यांचे 'ग्लॅमर' गोमंतकीयच्या मनातून कधीच उतरले गेले आहे. इफ्फीच्या काळात गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात उचंबळून येणाऱ्या चित्रपटमय जगाबद्दल बाहेरच्या सर्वसामान्य जगाला फारसे कुतूहलही राहिलेले नाही. 

इफ्फी ही खरे तर गोव्यात सिनेमा संस्कृती रुजवण्याची एक सुंदर संधी होती. मात्र गेली वीस वर्षे ज्या प्रकारे इफ्फीचा उपचार पार पाडला जात आहे ते पाहता या संधीची गाडी कधीच सुटून गेली आहे. गोव्यातील मर्यादित चित्रपट रसिक इफ्फीतील चित्रपटांचा आस्वाद गेली काही वर्षे घेत आलेले आहेत.‌

मात्र गोव्याचा विद्यार्थी किंवा युवा वर्ग (अपवाद वगळता) इफ्फीतील अर्थपूर्ण चित्रपटांचा लाभ उठवताना दिसत नाहीत किंवा त्यादृष्टीने प्रयत्नही होताना दिसत नाहीत. इफ्फी‌ गोव्यात अवतरण्यापूर्वी गोवा जेवढा 'चित्रपट साक्षर' होता तेवढाच तो  आजही राहिला आहे. काही चित्रपट निर्माते मात्र स्वतःच्या बळावर चित्रपट निर्मितीच्या खाचाखोचा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत हीच त्यातल्या त्यात आशादायक बाब आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT