IFFI Goa 2024 Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

IFFI Goa 2024 Opening Ceremony: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रख्यात अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची मांदियाळी रेडकार्पेटवर हजेरी लावणार आहे.

Manish Jadhav

पणजी: 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) उद्या, बुधवारी सायंकाळी 5 वाजता उद्‍घाटनाने प्रारंभ होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये या उद्‍घाटन सोहळ्यास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रख्यात अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची मांदियाळी रेडकार्पेटवर हजेरी लावणार आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल ग्रेसी दिग्दर्शित 'बेटर मॅन' या ओपनिंग फिल्मच्या रेड-कार्पेट प्रीमियरसह, आयनॉक्समध्ये दुपारी 2 वाजता उत्सवाची सुरुवात होईल. अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रिमियरला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री सावंत हे उपस्थित राहणार आहेत. 'बेटर मॅन'च्या निर्मिती टीम उपस्थिती लावेल.

नारार्जुन, बोमण इराणी, सुभाष घई यांची उपस्थिती

सिनेमॅटिक दिग्गजांच्या उपस्थितीत, गालाचा उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या उद्‍घाटन समारंभास प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, दिनेश विजन, अमर कौशिक, एन.एम. सुरेश, आरके सेल्वामणी, ईशारी गणेशन,

रवी कोतारकारा आणि गीतकार प्रसून जोशी, तसेच प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन, नित्या मेनन, आमला, विक्रांत मॅसी, रकुल प्रीत, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सान्या मल्होत्रा, जयम रवी,

जॅकी भगनानी, मुकता कुमार, आर. सोनाली कुलकर्णी आणि राधाकृष्णन पार्थिबन हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी श्री श्री रविशंकर यांचाही समावेश राहणार असून, ते विशेष भाषणाने प्रेरित करतील, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

कंट्री फोकस ऑस्ट्रेलिया

यंदाच्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलियाला ‘कंट्री फोकस' म्हणून निवडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्स नृत्य गट जानवी डान्स क्लॅन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारे एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. या सोहळ्यात भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे प्रदर्शन घडविले जाणार आहे. भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक सार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

याशिवाय, खास 'नाईन्टीज रिवाइंड' : डान्स एक्स्प्लोजन' बॉलीवूडच्या प्रतिष्ठित हिट गाण्यांवर विलक्षण सादरीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय, राज कपूर आणि मोहम्मद रफी सारख्या सिनेमॅटिक दिग्गजांना ‘टाइमलेस सोल्स' ही काव्यात्मक श्रद्धांजली व्हिज्युअल, संगीताद्वारे वाहिली जाईल.

चित्रपट प्रदर्शनासाठी 6 अतिरिक्त चित्रपटगृह सज्ज: मडगाव येथील आयनॉक्सची 4 आणि फोंडा येथील आयनॉक्सची 2 चित्रपटगृहे या वर्षी महोत्सवातील चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात आली आहेत. महोत्सवादरम्यान आयनॉक्स पणजी (4),मॅक्विनेझ पॅलेस (1), आयनॉक्स पोर्वोरीम (4), आयनॉक्स मडगाव (4), आयनॉक्स पोंडा (2) आणि झी स्क्वेअर सम्राट अशोक (2) अशा विविध 5 ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT