IFFI Goa 2023 Twitter
गोवा

IFFI Goa 2023: इफ्फीत आता नावाजलेल्या 'वेब सिरीज'लाही पुरस्कार, अनुराग ठाकूर यांची माहिती

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2023: गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागासाठी प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या आहेत.

इफ्फीत यावर्षीपासून मोठ्या पडद्यावरील चित्रपटांप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध आणि नावाजलेल्या वेबसिरीजलाही पारितोषिक देण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सर्वोत्कृष्ट वेबसिरीज पुरस्कार जाहीर करताना मला आनंद होत आहे. कलात्मक गुणवत्ता, उत्कृष्ट कथाकथन, तांत्रिक घटक अशा गोष्टी विचारात घेऊन नावाजलेल्या वेब सिरीजला पुरस्कार दिला जाईल. असे अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले आहे.

भारतात खूप प्रतिभा आहे. मी तुम्हाला उगवत्या आणि महत्त्वाकांक्षी नवीन भारताची कथा सांगण्यासाठी प्रोत्साहित करतो. एक अब्ज स्वप्न आणि अब्जावधी न सांगितलेल्या कथा सांगण्यासाठी आणि जगाचे नेतृत्व करण्यास तयार व्हा.

भारतीय भाषेतील ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मूळ वेब सिरीजला हा पुरस्कार दिला जाईल. असे ठाकूर यांंनी म्हटले आहे.

भारतातील OTT क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. भारतीय भाषांमधील कंटेटला प्रोत्साहन देणे. तसेच, OTT उद्योगाची वाढ आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षीपासून, हा पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. असे अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित होणाऱ्या फीचर आणि नॉन फीचर चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या आहेत. 10 ऑगस्टपर्यंत या विभागात फीचर, नॉन-फीचर चित्रपटांच्या प्रवेशिका सादर केल्या जाऊ शकतात. 30 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 दरम्यान पूर्ण केलेल्या चित्रपटांनाच यात सहभाग घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT