Shahid Kapoor IFFI Viral Video Dainik Gomantak
गोवा

IFFI Viral Video:...आणि नाचता नाचता शाहिद कपूर स्टेजवरुन कोसळला, पाहा व्हिडिओ

उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित कलाकारांनी यावेळी नृत्य सादरीकरण देखील केले.

Pramod Yadav

Shahid Kapoor IFFI Viral Video: गोव्यात आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सोमवारी बाम्बोळी येथे पार पडला. उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, सनी देओल, करण जोहर यासह विविध सिने कलाकार उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित कलाकारांनी यावेळी नृत्य सादरीकरण देखील केले. यावेळी शाहिद कपूर सोबत एक छोटासा अपघात झाला.

झाले असे की, चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर विविध कलाकारांनी नृत्य सादरीकरण केले. धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह शाहिद कपूर देखील विविध गाण्यांवर यावेळी धिरकला.

दरम्यान, एका गाण्यासाठी नृत्य सादरीकरण करताना शाहिद नाचत नाचत स्टेच्या कडेला आला. स्टेजचा अंदाज न आल्याने त्याचा पाय निसटला आणि तो खाली कोसळला.

मात्र, शाहिद थोड्याच वेळात स्वत:ला सावरत पुन्हा नृत्य करण्यास सुरुवात केली. यावेळी सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी एकच आवाज करत "शाहिद..." "शाहिद..." अशी घोषणा देत त्याला प्रोत्साहन दिले.

शाहिदने देखील चाहत्यांच्या प्रेमाला प्रत्युत्तर देत फ्लाईंग किस दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT