गोवा

इफ्फीमुळे तब्बल दोन वर्षांनंतर गोव्याचे गतवैभव उजळले

दैनिक गोमन्तक

पणजी: तब्बल दोन वर्षांनंतर राजधानी पणजी (Panaji) आणि एकूण गोव्याचे (Goa) गतवैभव उजळले आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण इफ्फीच्या निमित्ताने देशभरातील रसिकांसमवेत परदेशी रसिकांचीही पणजी शहरात रेलचेल वाढली आहे. अनेक आस्थापनांमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेलमालकांत (hotels) उत्साहाचे वातावरण आहे. गतवर्षी इफ्फीचे (IFFI) केवळ ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शन झाले होते. यंदा हायब्रीड पद्धतीने इफ्फीचे आयोजन केल्यामुळे देश-विदेशातील कलाकारांसह रसिक गोव्यात धडकले आहेत. गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे इफ्फीच्या नियोजनावर विरजण पडले होते.

त्यामुळे यंदा इफ्फीचा उत्साह वाढला आहे. देश-विदेशातून सिनेरसिक राज्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या व्यवसायातही यानिमित्ताने वृध्दीही होत आहे. गेल्या वर्षभरापासून पर्यटकांअभावी हॉटेलमालकांनी कामगार कपात केली होती. परंतु आता हॉटेल ‘फुल्ल’ होऊ लागल्याने कामगारांची कमतरता भासत आहे. पणजी मार्केटमध्येही खरेदीसाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे व्यापारी खूष आहेत.

लॉजचे भाडे वाढले

एरवी 900 ते हजार रूपयांत मिळणाऱ्या रूमला या दिवसांत 1400 ते 2 हजार रूपये मोजावे लागत आहेत. इफ्फीसाठी नोंदणी केलेल्यांना उशिरा सांगितले जात आहे. त्यांना गोव्यात आल्यानंतर लॉज मिळणे कठीण झाले आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाचेही दर वाढविले आहेत. त्यामुळे काही सिनेरसिक स्थानिक घरगुती खानावळींना पसंती देत आहेत.

स्थानिकांकडून होणाऱ्या खरेदीपेक्षा अधिक नफा पर्यटकांंनी केलेल्या खरेदीमुळे होतो. त्यामुळे दरवर्षी त्यांची प्रतीक्षा असते. गेल्या दोन वर्षांत पर्यटकांची संख्या रोडावली होती. यंदा इफ्फीच्या निमित्ताने पर्यटनाला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे. मांडवी किनाऱ्यावर स्थानिक कलाकारांनी भरवलेले कला प्रदर्शन तसेच इतर मनोरंजनाच्या स्टॉलवर लोकांची रोज सायंकाळी मोठी गर्दी होत आहे. इफ्फीसाठी आलेले काही प्रतिनिधी किनाऱ्यांवर जाऊन पर्यटनाचा आनंदही घेत आहेत. एकंदर राजधानी पणजी पर्यटकांमुळे गजबजली आहे.

परराज्यांतून आणि परदेशातून पर्यटक येऊ लागले की, गोव्यात सगळीकडे सर्वच गोष्टींचे दर वाढविले जातात. एरवी आम्ही गोव्यात येतो तेव्हा असे नसते. हॉटेलमालकांनी सध्या लयलूट चालविली आहे. ती थांबविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत.

- तुषार पवार, मुंबई

आम्ही दरवर्षी गोव्यात येतो. चित्रपट महोत्सव हा तर आमच्यासाठी खास असतोच; पण एरवीही आम्हाला गोवा आवडतो. परंतु गेल्या वर्षीपासून त्यात खंड पडला. यंदा पुन्हा चित्रपट महोत्सव सुरू झाल्याने गोव्यात येण्याची संधी मिळाली. कोविड महामारीनंतरचा हा अनुभव अविस्मरणीय आहे.

- कार्लिस मार्टिन, युरोप

गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसायाला मंदी भेडसावत आहे. यंदा मात्र दिलासा मिळेल, असे वातावरण तयार होत आहे. इफ्फीच्या निमित्ताने का होईना ग्राहक हॉटेलमध्ये येत आहेत. पुढील काळातही पर्यटकांची रेलचेल वाढल्यास सगळेच व्यवसाय पुन्हा उभे राहतील.

- प्रदीप शेट्टी, हॉटेलमालक, पणजी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT