पणजी: इफ्फीत यंदा २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान विशेष प्रकारे रचना केलेले मास्टरक्लासेस, उद्योग कार्यशाळा आणि नवीन कलाकारांना जागतिक मार्गदर्शकांशी जोडणारे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या इफ्फी सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. फिल्म बाजाराचे नामकरण ‘वेव्हज फिल्म बाजार’ करण्याचेही ठरवण्यात आले.
मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या मुख्यालयात समितीची ही बैठक केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम गोवा सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि एनएफडीसीचे वरिष्ठ अधिकारी सुकाणू समितीच्या सदस्यांचे पॅनेल हजर होते.
महोत्सवाच्या डिझाइनमध्ये अधिक समावेशकता आणि सर्जनशील अंतर्दृष्टी वाढवण्यासाठी सुकाणू समितीचा लक्षणीय विस्तार करण्यात आला असून सदस्यसंख्या १६ वरून ३१ झाली आहे, ज्यातून अधिक वैविध्यपूर्ण प्रतिनिधी मंडळ प्रतिबिंबित होत आहे.समितीत अनुपम खेर, गुनीत मोंगा कपूर, सुहासिनी मणिरत्नम, खुशबू सुंदर, पंकज पराशर आणि प्रसून जोशी सारख्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.