पणजी: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चित्रपट महोत्सव आणि हॅकेथॉन आयोजित केला जाणार आहे. हा उपक्रम २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान माहिती व प्रसारण मंत्रालय, एलटीआय माईंडट्री आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या सहकार्याने होणार आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्ट चित्रपटनिर्मिती आणि कथाकथनात ‘एआय’ कशाप्रकारे बदल घडवू शकते, याचा शोध घेणे हे आहे. या माध्यमातून चित्रपट निर्माते, तंत्रज्ञानतज्ञ आणि निर्माते एकत्र येऊन एआय-चालित साधनांचा वापर करतील.
इफ्फीचे संचालक आणि एआय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख शेखर कपूर म्हणाले की, हा उपक्रम तंत्रज्ञानाद्वारे सर्जनशीलता वाढविण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट हे नेहमीच मानवी कल्पनाशक्तीचे प्रतिबिंब राहिले आहेत आणि एआय या कल्पनाशक्तीला अधिक विस्तार देतो.”
एलटीआय माईंडट्रीचे कार्यकारी उपाध्यक्ष सुजय सेन यांनी सांगितले की, कथाकथनाचे भविष्य हे मानवी सर्जनशीलता आणि एआयच्या संगमावर आधारित असेल. या व्यासपीठातून नावीन्य आणि कल्पकतेला चालना मिळेल.
एआय चित्रपट महोत्सवात काल्पनिक कथा, माहितीपट, अॅनिमेशन आणि प्रायोगिक चित्रपट अशा विविध शैलींतील एआय-निर्मित चित्रपट प्रदर्शित केले जातील. शिवाय ४८ तासांचा ‘हॅकेथॉन’ होणार आहे. त्यात विकासक आणि कथाकार नवीन एआय आधारित चित्रपट साधनांवर काम करतील. चित्रपट निर्मितीत एआयचा वापर आणि तांत्रिक नीतिमत्तेवर कार्यशाळा, मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येतील.
५६व्या इफ्फीसाठी आतापर्यंत चार हजारांहून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार चित्रपटप्रेमी, ८५० विद्यार्थी प्रतिनिधी आणि ९०० चित्रपट व्यावसायिकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.