IFFI 2025 Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: इफ्फीत 'फॅशन शो'मधून हस्तकलेचा ग्लॅमरस प्रचार! महाराष्ट्रीयन अभिनेत्री सायली पाटीलसह दिग्गज मॉडेल्स उतरल्या रॅम्पवर

International Film Festival of India 2025: ‘हॅण्डलूम सारीज इन मोशन’ हा विशेष ‘फॅशन शो’ इफ्फीतील चित्रपट रसिकांसाठी मेजवानीच ठरला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘हॅण्डलूम सारीज इन मोशन’ हा विशेष ‘फॅशन शो’ इफ्फीतील चित्रपट रसिकांसाठी मेजवानीच ठरला. मराठमोठी अभिनेत्री सायली पाटील यांच्यासह १३ मॉडेल्सनी हॅण्डलूम साड्या परिधान करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या अनोख्या उपक्रमाचे इफ्फीतील इतरही कलाकारांनी कौतुक केले. वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ‘शिखाज कारिगिरी’ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यासंदर्भात, ‘शिखाज कारिगिरी’ या संस्थेच्या शिखा अजमेरा यांनी सांगितले की, गोव्यात सुरु असलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक एकत्र येत असतात.

या सर्वांमध्ये हस्तकलेबद्दलची उत्सुकता वाढावी यासाठी आम्ही फॅशन शोचे आयोजन केले. महोत्सवातील सहभागी कलाकारांनी या उपक्रमाचे काैतुक केले. सहभागी मॉडेल्सला आपल्या एवढ्या व्यासपीठावर सहभागी होत असल्याचे समाधान मिळाले.

आयनॉक्स परिसरात उत्साह अन्‌ जल्लेाष

आयनॉक्स परिसरातील खुले मंच, रंगीबेरंगी लायटिंग आणि हातमाग साड्यांनी सजलेला रॅम्प यामुळे कार्यक्रमाला खास उत्सवमय रंग चढला. फॅशन शो दरम्यान प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मॉडेल्सचे स्वागत केले.

पारंपरिक ते आधुनिक अशा विविध शैलींत सादर केलेल्या साड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी भारतीय हातमाग व हस्तकलेचा आंतरराष्ट्रीय मंचावर अशाप्रकारे होत असलेला गौरव हा अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT