Gulshan Grover at IFFI 2023:  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: सलमा हायकचे एवढे वाईट दिवस आले? ऋषी कपूर यांनी गुलशन ग्रोव्हरना केला होता सवाल, वाचा काय घडले होते...

'इफ्फी'मध्ये बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर यांनी साधला संवाद

Akshay Nirmale

Gulshan Grover at IFFI 2023: हॉलीवूडची हॉट अभिनेत्री सलमा हायक हिच्यासोबत थेट तिच्या नवऱ्याची भूमिका मला मिळाली होती. तेव्हा ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ यांचा खूप जळफळाट झाला होता, अशी मजेशीर आठवण हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितली.

या कार्यक्रमात चित्रपटांत खलनायकांच्या भूमिका साकारलेले रणजीत, रझा मुराद, किरण कुमार, गुलशन ग्रोव्हर हे सहभागी झाले होते. चित्रपट उद्योग विश्लेषक कोमल नाहटा यांनी या सर्वांशी दिलखुलास संवाद साधला.

गुलशन ग्रोव्हर म्हणाले, मी एका हॉलीवूडच्या चित्रपटात काम करत होतो. त्याचे नाव होते 'द ड्रायव्हर'. या चित्रपटात अभिनेत्री सलमा हायक माझ्या बायकोच्या भूमिकेत होती. जेव्हा ऋषी कपूर यांना हे कळाले तेव्हा त्यांचा खूप जळफळाट झाला. ते माझे चांगले मित्र आहेत. पण ते खूप निराश झाले.

ते मला म्हणाले, सलमा हायक तुझ्या बायकोची भूमिका करतेय? मी म्हणालो, होय, दिग्दर्शकाने घेतलेय. ऋषी कपूर म्हणाले, क्या यार? सलमा हायक के इतने बुरे दिन आ गये... मी म्हणालो, शुटिंग सुरू झालेय आता तुमचा काहीही चॅन्स नाहीय. ऋषी कपूर म्हणाले, जेव्हा तुझे शुटिंग असेल तेव्हा मी सोबत येईन.

जॅकी श्रॉफला जेव्हा कळाले तेव्हा ते म्हणाले की, भिडू मै तेरेको एक शाल दुँगा, उसको पेहनाना. बोलना जग्गू ने दी है.

हीरोंना जितका पैसा मिळतो तितका व्हिलन्सना मिळत नाही, याबाबत विचारले असता गुलशन ग्रोव्हर म्हणाले की, हे मला मान्य नाही. आपल्याकडे व्हिलन्सची चांगली लीगसी आहे. खलनायकी भूमिकांना अनेकांनी प्रतिष्ठा दिली.

प्राण, अमरिश पुरी हे खूप महान खलनायक होते. तेव्हाच क्लियर झाले होते की, केवळ हीरो पुरेसा नाही. व्हिलनही तितकाच महत्वाचा आहे. आता हीरो काय हीरोईनशी फायटिंग करेल काय?

माझ्याबाबत सांगायचे तर अनेकदा हीरो मला फोन करायचा कारण माझ्याकडे डेट्स नसायच्या आणि हीरो मला विनंती करतोय की चार तास वेळ काढ फक्त एवढे पूर्ण करून टाकूया. डॅनीसाहेब, अमजद खान साहेब यांना जे पाहिजे ते स्टेजवर मिळायचे. आणि त्याबाबत कुणालाही काहीही तक्रार नसायची, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

SCROLL FOR NEXT