International Language Day Dainik Gomantak
गोवा

International Mother Language Day: जग समजून घ्यायचे तर वाचन हवेच!- मावजो, सैल यांचा तरुण लेखकांना सल्ला

मडगावात ‘भास-संवाद'चे जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मडगावात आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

International Mother Language Day सर्वोत्तम साहित्यिक बनण्यासाठीच नव्हे तर जग समजून घ्यायचे तर विविध लेखकांच्या साहित्याचे वाचन अत्यावश्यक आहे,असा सल्ला कोकणी भाषा मंडळाने जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मडगावात आयोजित भास संवाद कार्यक्रमात ज्ञानपीठकार दामोदर मावजो व सरस्वती सन्मान प्राप्त महाबळेश्र्वर सैल यांनी तरूण लेखकांना दिला.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीची जाणिव उपस्थितांना करून दिली. साहित्याची स्फूर्ती कशी मिळाली, पुरस्कार म्हणजे त्यांच्यासाठी नेमके काय,याबद्दलही मौलिक विचार मांडले.

जर आपल्याला जग समजून घ्यायचे असेल तर वेगवेगळ्या देशांतील तसेच आपल्या देशातील वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य वाचणे गरजेचे आहे, असे मावजो यांनी सांगितले. जर कोकणी लेखकांनी वाचन केले तर नवे नव्या शब्दांची ओळख होईल व त्यातून भाषेची स्वतःची मर्यादाही वाढेल.

पसरकार होण्याचा आपल्याला अभिमान आहे. पसरकार झाल्यामुळेच अप्रतिम साहित्य रचना करू शकलो, असेही मावजो यांनी एका प्रश्र्नाला उत्तर देताना सांगितले.

मी ज्या निसर्गरम्य वातावरणात लहानाचा मोठा झालो, त्याचा आपल्या साहित्यावर प्रभाव पडला,असे सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक महाबळेश्र्वर सैल यांनी सांगितले. त्यामुळे त्यावेळी मी अनुभवलेल्या गरिबी, लाचारी, असहायता यांचे प्रभावी चित्रण कादंबरीतून करू शकलो, असेही सैल म्हणाले.

या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांची मुलाखत ब्रिजेश देसाई व तन्वी बांबोळकर यांनी घेतली. कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी स्वागत केले.

कोकणी भाषेची ओळख जागतिक स्तरावर पोहोचावी,यासाठी कोकणी साहित्याचा अन्य भाषांमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे. आपले मूळ विचार केवळ मातृभाषेतून परिणामकारकरित्या व्यक्त होऊ शकतात.

-दामोदर मावजो, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक

आपण कधीच पुरस्काराची अपेक्षा बाळगली नाही. पुरस्कारामुळे साहित्यनिर्मितीत वाढ झाली. लेखक म्हणून जगताना कधीही गर्व मनाला शिवला नाही. सैन्यांत काम करतानाही अधून मधून लेखन केले होते.

-महाबळेश्‍वर सैल, सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT