Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: नवीन वर्षात गोव्यात फिरायला येण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Goa Weather Update: तापमान 21.4 अंश सेल्सिअसवर; ग्रामीण भागात तीव्रता अधिक; उबदार कपड्यांना पसंती

दैनिक गोमन्तक

Goa Weather Update: राज्यात मागील दोन-चार दिवसांपासून थंडी पडत आहे. ऐन नाताळ सणात थंडीला सुरवात झाल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. पणजीतील किमान तापमानाचा पारा 21.4 अंश सेल्सिअस एवढा झाला होता. ग्रामीण भागासह शहरी भागातही मागील दोन दिवसांपासून थंडीला सुरवात झाली आहे.

गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार-पाच दिवस राज्यातील हवामानात मोठे बदल घडणार नाहीत. हवामान कोरडे राहील, तर काही भागात पहाटे दव आणि धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलांमुळे नागरिक वैतागले होते.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उष्म्यापासूनही आता थंडी पडू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा खऱ्या अर्थाने आता थंडीला सुरवात झाली आहे. मागील महिन्याभरात राज्यातील घाटालगतच्या भागात काहीप्रमाणात थंडी जाणवत होती, परंतु कधी थंडी तर कधी उष्मा असा खेळ सुरू होता. आता राज्यात थंडीला सुरवात झाल्याने काही काळ का होईना उष्‍म्यापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे.

उत्सव काळात उत्साह

राज्याच्या ग्रामीण भागात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे स्वेटर, गरम कपडे नागरिक परिधान करत आहेत तसेच ग्रामीण भागात शेकोटी पेटवून अनेक ठिकाणी नागरिक बसलेले दिसतात. राज्यात जत्रोत्सव, कालोत्सव तसेच दत्तजयंती, नाताळानिमित्त रात्रीचे विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होत असल्याने थंडीमुळे उत्सवांचा उत्साह वाढत आहे.

खबरदारीची गरज

राज्यात वाढत असलेल्या थंडीमुळे अनेकजण आजारी पडत आहेत. कोरोनाची धास्ती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे जरुरीचे आहे. शक्यतो पाणी उकळून प्यावे, तेलकट पदार्थ, थंडपेय, आइस्क्रीम, तसेच बाहेरचे अन्न खाणे शक्यतो टाळावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT