Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: ....म्‍हणून टीका बंद होणार नाही; पर्यटनमंत्री खवंटे यांच्या मिठीवरती प्रतिक्रिया

Rohan Khaunte Hugs Vijai Sardesai: स्‍थानिकांचा महोत्‍सवांना विरोध असेल तर तो महोत्‍सव बंद करणे गरजेचे आहे, असे मत सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्‍या पर्यटन धोरणाचे विधानसभा अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी वाभाडे काढले. त्‍यानंतर विधानसभेतून बाहेर आल्‍यावर रोहन यांनी त्‍यांना मिठी मारली. यासंबंधीचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल झालेला असून हा काय फिक्‍सिंगचा प्रकार असा प्रश्‍न काही लोक विचारू लागले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना आज विजय सरदेसाई यांना विचारले असता, गोवेकरांना सतावणाऱ्या समस्‍यांवर कुठल्‍याही प्रकारचे फिक्‍सिंग होणे शक्‍य नाही. रोहनने मला मिठी मारली. मी त्‍यांना मिठी मारली नाही. रोहन खवंटे यांची धोरणे चुकीची असल्‍यास मी यापुढेही त्‍यांचे असेच वाभाडे काढणार. मिठी मारली म्‍हणून टीका बंद होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

ते पुढे असे म्‍हणाले, कदाचित त्‍या दिवशी मी काय बोललो ते खवंटे यांना मनापासून आवडले असेल. त्‍यामुळेच त्‍यांनी विधानसभेच्‍या बाहेर आल्‍यावर मला मिठी मारली असावी. लोकांनीही एक गोष्‍ट ध्‍यानात ठेवणे आवश्‍‍यक आहे, सरकार आणि विरोधक ही आमची भूमिका आम्‍ही अधिवेशनात समर्थपणे मांडू शकतो.

पण विधानसभेच्‍या बाहेर आल्‍यानंतर काही सामाजिक संकेत असतात आणि त्‍याचे जर पालन केले, तर कुणीही हरकत घेण्‍याची गरज नाही. आम्‍ही विरोधक असलो, तरी एकमेकांची डोकी फोडण्‍या इतपत ते शत्रू नाहीत, याची लोकांनी जाण ठेवणे आवश्‍‍यक आहे.

गोवा विधानसभेसाठी हे असे वागणे नवीन नाही. यापूर्वी भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्‍यमंत्री असताना, विरोधी पक्ष नेते डॉ. जॅक सिक्‍वेरा त्‍यांना विधानसभेत धारेवर धरायचे. मात्र विधानसभा संपल्‍यावर ते बाहेर यायचे त्‍यावेळी त्‍यांचे संबंध मैत्रीचेच असायचे. गोमंतकीय संस्‍कृतीत हा असा स्‍वभाव खालीपर्यंत भिनलेला आहे. त्‍यामुळे त्‍यात आश्‍चर्य करण्‍यासारखे काही नाही, असे सरदेसाई म्‍हणाले.

सनबर्न मोपालाच होणार

सनबर्नच्‍या आयोजकांनी आपला हा ब्रँड जीएमआरला विकला आहे, अशी माहिती ऐकू येत आहे, असा दावा विजय सरदेसाई यांनी केला. मात्र असे महोत्‍सव आयोजित करताना स्‍थानिकांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. स्‍थानिकांचा अशा महोत्‍सवांना विरोध असेल तर तो महोत्‍सव बंद करणे गरजेचे आहे, असे मत सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT