Goa Agriculture Dainik Goamnatk
गोवा

Goa Agriculture: राज्यातील शेती संकटात, शेतकरी चिंतेत; पावसाची प्रतिक्षा

आर्द्रतेत वाढ, कमाल पारा 32 अंशावर

दैनिक गोमन्तक

राज्यात मागील महिन्याभरात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वरुण राजाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पिकांवर संकट ओढवणार आहे. भात शेतीला मोठा फटका बसू शकतो.

भात शेती पाणी नसल्याने ऐन पोषण घेण्याच्या दिवसात पीक कोमेजू लागल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. यंदा राज्यात जूनच्या मध्यात मॉन्सूनचे आगमन झाले.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक रिकोर्डब्रेक पाऊस पडला परंतु ऑगस्ट महिन्यात केवळ १२ इंच पाऊस पडला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील अपेक्षे प्रमाणे पाऊस पडेल याची शाश्‍वती नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत ११० इंच पाऊस पडला आहे. सरासरी एवढा पाऊस पडला आहे.

अन्य पीकही धोक्यात

भात पिकासोबतच काकडी, दोडकी, भाजीपाला, अळूमाडी, चिबूड तसेच इतर भाज्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तसेच तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हे पीक धोक्यात आले आहे.

"राज्यात यंदा मान्सूनने उशिरा आगमन झाले, त्यामुळे पीक लावणी उशिरा झाली. त्यानंतर जुलै महिन्यात अतिरिक्त पाऊस पडला परंतु मागील महिन्यापासून पावसात निश्‍चितपणाने घट झाली आहे."

"हा पिकांच्या पोषणाचा काळ असल्याने या दिवसात योग्य पाऊस पडला नाही तर पिकात घट होऊ शकते. भातात चिंब अधिक धरू शकते. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस पडला नाही तर निश्‍चितपणे शेतीसाठी चिंतेची बाब ठरू शकते."

- नेव्हील आल्फोन्सो, कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

41,663 रुपये दारुवर उडवले, बाकी गोवा ट्रीपचा खर्च फक्त 32 हजार; तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ Watch

SCROLL FOR NEXT