Red Chilli Market Dainik Gomantak
गोवा

Local Red Chilli in Goa: गावठी मिरची झाली ‘गोड! पाऊस लांबणीवर पडल्यास आवक आणखी वाढणार

भाव घसरला : 300 रुपये किलो; डिचोली बाजारात आवक वाढली

गोमन्तक डिजिटल टीम

Local Red Chilli in Goa: गावठी लाल मिरची आता स्वस्त झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आज बुधवारी डिचोलीच्या साप्ताहिक बाजारात या मिरचीचा भाव निम्‍म्‍यावर आला.

मिरची स्वस्त झाली असली तरी ग्राहकांनी यापूर्वीच मिरचीचा ‘पुरुमेंत’ केल्याने व त्यातच पावसाळा जवळ आल्याने आज मिरचीला मागणी कमी होती.

गेल्या महिन्यात हजारावर गेलेल्या गावठी मिरचीचा भाव आता 300 ते 400रुपये असा झाला आहे. दरम्यान, पाऊस लांबणीवर पडल्यास पुढील साप्ताहिक बाजारापर्यंत डिचोलीत मिरचीची आवक आणखी वाढणार असल्याचे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

रोगाचा प्रादुर्भाव, त्यातच अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षी मिरची पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. परिणामी गेल्या वर्षी स्थानिक मिरची महाग झाली होती. त्‍या तुलनेत यंदा मात्र गावठी मिरचीचे पीक समाधानकारक आले आहे.

यंदा महिन्यापूर्वी साफ केलेल्या स्थानिक गावठी मिरचीचे दर 800 ते 900 रुपये असे होते. नंतर आवक वाढल्याने मिरचीचा भाव घसरत गेला. गेल्या दोन साप्ताहिक बाजारात 600 ते 800 रुपये प्रतिकिलो या दराने गावठी मिरची विकण्यात येत होती. आता तर भाव निम्मा झाला आहे.

राज्याबाहेरील मिरचीला माेठी मागणी

डिचोली बाजारात डिचोलीसह पेडणे, बार्देश, सत्तरी आदी तालुक्‍यांतील काही भागात पिकणाऱ्या गावठी मिरचीसह कर्नाटक तसेच सिंधुदुर्गातील मिरची येत आहे. गेल्या आठवडी बाजारापासून बाजारात येणाऱ्या मिरचीचे प्रमाण वाढले आहे.

राज्यातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीपेक्षा कर्नाटकातील जांबोटी आणि महाराष्ट्रातील बांदा आदी भागातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीचे प्रमाणही अधिक आहे. बेडगी आणि अन्य जातीची मिरची अजूनही बाजारात विक्रीस येत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT