Goa Shacks and Tourism Department Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Department: शॅक दुसऱ्याला दिल्यास खबरदार!

Goa Tourism: पर्यटन खाते : परवाना होईल रद्द; राज्याचे नवे शॅक धोरण लवकरच

दैनिक गोमन्तक

Goa Tourism Department: शॅक परवानाधारकाने शॅक दुसऱ्याला चालवण्यास दिल्यास त्याचा परवाना रद्द करून यापुढे त्याला शॅक परवान्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्याची तरतूद नियमांत करण्याचा विचार पर्यटन खात्याने चालवला आहे.

येत्या १० दिवसांत राज्याचे नवे शॅक धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॅक परवाने देण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी इच्छुक व्यावसायिकांकडून केली जात आहे.

अनुभवी शॅक व्यावसायिकांसाठी 50 टक्के तर नव्‍या अर्जदारांना ५० टक्के शॅक राखीव ठेवावेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुचवण्यात आले होते. मात्र, ती मागणी मान्य करण्याविषयी पर्यटन खाते अनुकूल नाही.

सध्या 90 टक्के शॅक अनुभवी अर्जदारांना तर 10 टक्के शॅक नव्या अर्जदारांना दिले जातात. परवान्यांचे वाटप सोडत पद्धतीने केले जाते.

त्यात फारतर ७५-२५ टक्के असा बदल करता येईल, असे पर्यटन खात्याचे म्हणणे आहे. येत्या १० दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

अटी समानच

किनाऱ्यावर सरकारी मालकीच्या जागेत शॅक घालण्यासाठी हे परवाने दिले जातात. खासगी जागेतील शॅकचे परवाने हे जमीनमालकाला किंवा त्याने ना हरकत दाखला दिलेल्या व्यक्तीस दिले जातात.

त्या शॅक परवान्यांसाठी व सरकारी मालकीच्या किनारी भागातील जागेवरील शॅकसाठी अटी समानच आहेत.

भाडे कराराने शॅक देण्यास बंदी : सरकारी मालकीच्या जागेतील शॅक हे स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने दिले जात असल्याने ते भाडे कराराने देण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तशी अट परवाना देताना घातली जाते.

मात्र, त्याचे तंतोतंत पालन केले जात नाही. यंदापासून शॅक चालवण्यास दिल्यास त्या अर्जदाराचा परवाना रद्द करण्यासह त्याला यापुढे परवान्यासाठी अर्ज करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठी दुर्घटना; पाकिस्तानी खेळाडूमुळे पंच जखमी, चेंडू थेट डोक्यात...VIDEO VIRAL

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

SCROLL FOR NEXT