बहुजन व दलितांच्या हक्कांसाठी लढणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.  Dainik Gomantak
गोवा

बहुजन समाज व दलितांसाठी न्याय मागणे अपराध असल्यास तो मी पुन्हा करेन - कामत

बहुजन समाज, दलित यांना न्याय देण्यासाठी तसेच गोव्याची अस्मिता राखण्यासाठी आवाज उठविणे हा भाजप सरकारात गुन्हा ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (The first Chief Minister Bhausaheb Bandodkar) यांनी नेहमीच बहुजन समाजाला स्वावलंबी बनविण्याची दूरदृष्टी ठेवली व त्यांना अग्रस्थान देण्याचा प्रयत्न केला. बहुजन व दलितांच्या हक्कांसाठी लढणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. बहुजन समाज व दलितांसाठी न्याय मागणे (Seeking justice for Bahujan Samaj and Dalits) हा भाजप सरकारामध्ये गुन्हा ठरत असेल तर तो मी पुन्हा पुन्हा करेन असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Opposition leader Digambar Kamat) यांनी म्हटले.

आज गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांनी मिरामार येथे भाऊसाहेबांची समाधी व पणजी येथील पुतळ्याला हार घालुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, म्हापसाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, पणजीचे नगरसेवक ज्योएल आंद्राद, मडगावचे नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, दामोदर वरक, सगुण नायक, सिद्धांत गडेकर तसेच इतर हजर होते.

आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी दिनीच माझे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या एक नऊ वर्षाच्या दलित मुलीला न्याय मागणारे एक ट्विट केले होते व सदर मुलीच्या पालकांसोबत आपला फोटो सदर ट्विट बरोबर जोडला होता. त्या नंतर राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते. राहुल गांधीं यांनी व्यक्त केलेल्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी मी ट्विट केल्यानंतर आज माझे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

बहुजन समाज, दलित यांना न्याय देण्यासाठी तसेच गोव्याची अस्मिता राखण्यासाठी आवाज उठविणे हा भाजप सरकारात गुन्हा ठरला आहे. आज भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला बहुजन समाजाच्या हक्कासाठी व गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी लढण्याची मी शपथ घेतो असे दिगंबर कामत म्हणाले.

भाजप सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या भावनांची सरकारला कदर नाही. महिलांचा सन्मान करणे हे सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी असुन, दुर्देवाने सरकार त्यांचा आवाज दडपुन टाकत आहे असा आरोप दिगंबर कामत यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT