Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: ...तर गडकरींनी सुनावल्या असत्या आणखी चार गोष्टी

Goa Congress Press Conference: दक्षिण गोव्यातील कृतीचे अनुकरण उत्तर गोव्यातील जनता करेल

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे झालेली रस्त्यांची चाळण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या नेत्यांनी दाखवायला हवी होती. तसे केले असते तर त्यांनी आणखी चार गोष्टी भाजपवाल्यांनाच सुनावल्या असत्या, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

युरी म्हणाले की, आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही. म्हणून आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा ठराव फेटाळला जातो. वित्तीय आघाडीवरही सरकार कोलमडले आहे. प्रशासन ठप्प झाले आहे. खाणी याच भाजप सरकारने संपवल्या, आता ते पर्यटन व्यवसाय संपवण्यास निघाले आहेत. त्यासाठी राक्षसी कायदा ते आणू पाहत आहेत, त्याला सर्वतोपरी विरोध केला जाईल. सध्या असलेलेच पोलिस पर्यटकांना सतावतात, मग आणखी वेगळे दल स्थापन करून सतावणूक वाढवायची आहे का?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, अपात्रता याचिकांवर निकाल कधी देणार, या विषयावर सभापती मौन बाळगतात. त्यांनी आपली मर्यादा पाळावी. अकारण आमदारांना ‘अपरिपक्व’ संबोधू नये. विधवा भेदभाव विधेयकावर वर्षभऱ का निर्णय घेतला जात नाही? मंत्री विश्वजीत राणे यांनी नगरनियोजन खात्याने कोणा-कोणाची कामे केली, याची नावे जाहीर करताना त्यांना जवळ असलेल्यांचीही नावे जाहीर करावीत.

दक्षिणेतील पुनरावृत्ती उत्तरेतही होणार

आलेमाव म्हणाले की, गडकरी यांनी आज भाजपच्या नेत्यांना योग्य असेच मार्गदर्शन केले. भाजपवाल्यांना लोकसभा निवडणुकीआधी कुठे आहेत विरोधक, असे वाटत होते. निकालानंतरही ते जागे झालेले नाहीत. त्यातूनच ते किती मतदारसंघांत आघाडी मिळाली याच्या बेरजा करत निघाले आहेत. पण जनता आता त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. दक्षिण गोव्यातील जनतेने केलेल्या कृतीचे अनुकरण उत्तर गोव्यातील जनता विधानसभा निवडणुकीत करेल आणि भाजपला त्यांची जागा दाखवणार आहे.

...म्हणून गडकरींची भेट नाकारली

आलेमाव म्हणाले की, केवळ चांगल्या कामांचे दर्शन तेवढे गडकरी यांना करवून सरकारने उगाचच स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. गडकरी यांची आम्ही भेट मागितली होती. आपले पितळ उघडे पडेल म्हणून स्थानिक पातळीवरून ही भेट होऊ ऩये यासाठी प्रयत्न झाले असावेत, असा कयास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT