Yuri Alemao: कला अकादमी नूतनीकरणाचे काम म्हणजे ‘मिशन टोटल कमिशन'

Kala Academy: पडलेला भाग, भिंतीवरून झिरपणारे पाणी; अनेक समस्या
Kala Academy: पडलेला भाग, भिंतीवरून झिरपणारे पाणी; अनेक समस्या
Kala Academy AC UnitDainik Gomantak

राज्याचे भूषण म्हणून कला अकादमीची वास्तू ओळखली जाते, ती ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अकादमी ही ऐतिहासिक वास्तू आहे, तिचे जतन होणे आवश्‍यक आहे; परंतु कला अकादमीतील नूतनीकरणाचे काम हे ‘मिशन टोटल कमिशन'' झाले असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अकादमीच्या कामाची त्वरित श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

यावेळी आलेमाव यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनचे सदस्य आर्मेनियो रिबेरो, कला राखण मंचच्या सचिव सिसिल रॉड्रिग्स, सदस्य फ्रान्सिस कुएल्हो, ज्ञानेश मोघे, साईश पाणंदीकर, दामोदर कामत, दिलीप प्रभुदेसाई, कला व संस्कृती खात्याचे सगुण वेळीप, सदस्य सचिव अरविंद खुटकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दयानंद नाडकर्णी, साहायक अभियंता विनय भोबे उपस्थित होते.

सुरुवातीला कला अकादमीच्या सर्व भागांची पाहणी आलेमाव-पाटकर यांनी केली. त्यानंतर आलेमाव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी भाजप सरकारवर टीकास्र सोडले. नूतनीकरणाचे निकृष्ट काम पाहता, हा अकादमी संपविण्याचा प्रकार असल्याचे दिसतो. पेपरफुटी, मोपा विमानतळावरील गैरसोय, कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या सरकारी इमारती अशा प्रकारांमुळे हे सरकार टीकेचे धनी बनले आहे.

साबांखाने नूतनीकरणावर ६० ते ७० कोटी रुपये खर्च केले आहेत; पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या वास्तूची पूर्णत: वाताहत झाली आहे. ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याची गळती होते.

Kala Academy: पडलेला भाग, भिंतीवरून झिरपणारे पाणी; अनेक समस्या
Kala Academy: 'कला अकादमी'वरुन कलाकार आक्रमक!

अधिवेशनात प्रश्‍न मांडू

राज्य सरकार कलाकारांना अकादमीच्या माध्यमातून त्रास देत आहे. कला अकादमीत ध्वनी यंत्रणा चालू नसतानाही नाटक सादर करता येत होते; पण सध्या बसविलेली ध्वनियंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. व्यासपीठावर चुकीच्या पद्धतीने दिवे लावले आहेत. अकादमीचा विषय अधिवेशनात मांडू, असेही आलेमाव म्हणाले.

Kala Academy: पडलेला भाग, भिंतीवरून झिरपणारे पाणी; अनेक समस्या
Yuri Alemao: ‘’भांडवलदारांना खूश करणाऱ्या प्रकल्पांना गोमंतकीयांचा विरोधच...’’; भाजप सरकारवर बरसले आलेमाव

अनेक समस्या

सर्वांनी अगोदर कला अकादमीचा प्रत्येक कोपरा जाऊन पाहिला. एका बाजूला पडलेला भाग, दुसऱ्या बाजूला ब्लॅक बॉक्सच्या तांत्रिक विभागातून होणारी पाण्याची गळती, टॉयलेटच्या बाजूला असलेल्या (खुल्या रंगमंचाच्या पायऱ्यांच्या खालील) जागेत भिंतीवरून झिरपणारे दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com