Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: मोबाईलचे दुष्परिणाम ओळखाः सुभाष फळदेसाई

Subhash Phaldesai: 108 विद्यार्थ्यांचा गौरव : ‘शिक्षा व्हिजन’तर्फे मुळगावात कार्यक्रम साजरा

दैनिक गोमन्तक

Subhash Phaldesai: जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करायला पाहिजे. अनुकरण न करता, ध्येयप्राप्तीसाठी मेहनत घेणे तेवढेच गरजेचे आहे. मोबाईलच्या अति आणि गैरवापरामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. मोबाईलच्या अतिरेकापासून भविष्यातील दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे.

त्याबाबतीत पालकांनीही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

शिक्षा व्हिजन डिचोलीतर्फे आयोजित विद्यार्थी अभिनंदन सोहळ्यात मंत्री फळदेसाई प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून मोबाईलचा केवळ शिक्षणापुरताच वापर करावा, असे आवाहनही सुभाष फळदेसाई यांनी केले.

रविवारी (ता.२२) मुळगाव येथे आयोजित या सोहळ्याप्रसंगी शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश आमोणकर,

मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, साळच्या सरपंच सावित्री घाडी, मेणकुरेचे सरपंच गुरुदास परब, अडवलपालचे सरपंच गजानन पालकर, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक यांच्यासह विविध पंचायतींचे पंचसदस्य उपस्थित होते.

मुळगाव, साळ, मेणकुरे, अडवलपाल आणि लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेतील १०८ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पीएचडी मिळवलेले प्रा. दत्ता परब यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. दिनेश आमोणकर यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT