Sunburn Festival Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa: दक्षिणेत सनबर्नची शक्यता मावळली? किटल-बेतुल येथील प्रस्ताव IDC ने नाकारला

Sunburn Festival In Goa: दक्षिण गोव्यात हा महोत्सव नको, यासाठी सध्या सर्वजण सक्रिय झाले आहेत.

Pramod Yadav

दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजित केला जाणार, यावरुन सर्वस्तरातून विरोध वाढला असताना किटल-बेतुल येथे सनबर्न होण्याची शक्यता मावळल्यातच जमा आहे.

तेथे असलेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने माहिती अध्यक्ष फेटाळल्याची आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली.

महामंडळाची बैठक सोमवारी झाली होती. त्यात आयोजकांनी थेटपणे सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन तो नाकारण्याचा निर्णय घेतला गेला. दक्षिण गोव्यात हा महोत्सव नको, यासाठी सध्या सर्वजण सक्रिय झाले आहेत.

गेल्या वर्षी या महोत्सवाच्या आयोजकांनी गोव्यातून गाशा गुंडाळत असल्याची घोषणा केली होती. यावरून विनाकारण आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे.

सनबर्नमुळे ड्रग कल्चर आणि गुन्हेगारीत वाढ

गोव्यात सनबर्नमुळे ड्रग कल्चर आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत गोव्यातून सनबर्न हद्दपार करण्याची मागणी केली.

उत्तर किंवा दक्षिण कुठेच हा महोत्सव आयोजित न करण्याची मागणी त्यांनी पर्यटन खात्याच्या सूचना आणि कपात सत्रात याबाबत मागणी केली होती.

यासह राज्यातील विविध सामाजिक संस्थांनी या महोत्सवाला विरोध दर्शवला होता. दरम्यान, किटल-बेतुल येथे परवानगी नाकारल्यानंतर आता आयोजक पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT