Goa Taxi: टॅक्सीचा मुद्दा तापला! चालक आक्रमक मंत्री माविन यांच्या राजीनाम्याची मागणी

Taxi Operators: माविन वाहतूक खाते सांभाळण्यास असक्षम आहेत. त्यांना टॅक्सीच्या मुद्यावर तोडगा काढता आला नाही.
Goa Taxi: टॅक्सीचा मुद्दा तापला! चालक आक्रमक मंत्री माविन यांच्या राजीनाम्याची मागणी
Taxi Operators at Mapusa GroundDainik Gomantak
Published on
Updated on

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा माईल्सच्या समर्थनात भाष्य करत स्थानिक टॅक्सी चालक नोंदणीकृत नसल्याने सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा केला. टॅक्सी चालकाचे प्रकरण आता चांगलेच तापले असून, त्यांनी माविन वाहतूक खाते सांभाळण्यात असक्षम असल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराजवळ आज (बुधवारी, दि.२४ जुलै) मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या टॅक्सी चालकांनी माविन यांच्याविरोधात भाष्य करत टॅक्सीच्या मुद्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

माविन वाहतूक खाते सांभाळण्यास असक्षम आहेत. त्यांना टॅक्सीच्या मुद्यावर तोडगा काढता आला नाही. त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी. त्यांनी आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवू नये, अशी एकत्र आलेल्या टॅक्सी चालकांनी मागणी केली.

टॅक्सी चालकांनी आक्रमक भूमिका घेत, नव्याने उभारलेल्या मोपा लिंक रोडवरील टोल देखील हटवण्याची मागणी केली.

Goa Taxi: टॅक्सीचा मुद्दा तापला! चालक आक्रमक मंत्री माविन यांच्या राजीनाम्याची मागणी
Goa Third District: सभापती रमेश तवडकरही म्हणतात, 'गोव्यात तिसरा जिल्हा व्हावा', कारणही स्पष्ट केले

मोपा लिंक रोडवरील टोल हटवला नाही तर प्रवाशांना टोलच्या प्रवेशद्वारावरच सोडले जाईल. तिथून विमानतळापर्यंतचा प्रवास त्यांनी पायी करावा अथवा जीएमआर कंपनीने त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी, अशी भूमिका टॅक्सी चालकांनी घेतली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथील गोवा माईल्सचे काउंटर हटवावे अशी मागणी करणाऱ्या आमदार आर्लेकरांना उत्तर देताना देताना माविन यांना गोवा माईल्सच्या समर्थनात भाष्य केले होते. स्थानिक टॅक्सी चालक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्याने सरकारला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे देखील माविन म्हणाले होते.

दरम्यान, याच प्रकरणावरुन माविन यांना जीवे मारण्याची धमकी आली असून, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com