Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आईस्क्रीम फ्रँचायझी देतो, असे सांगून घातला 4 लाखांना गंडा; बिहारमधून तरुणाला अटक

Goa Icecream Fraud: फिर्यादीस ४ लाख २४ हजार ९०० रुपये नोंदणी, सुरक्षा व सॉफ्टवेअर शुल्क स्वरुपात पैसे दोन बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने पैसे ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा केले.

Sameer Panditrao

म्हापसा: आईस्क्रीम फ्रँचायझी देतो, असे सांगून थिवीमधील फिर्यादीला तब्बल ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयिताला पटना, बिहारमधून ताब्यात घेत अटक केली. या संशयिताला पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर गुरुवारी गोव्यात आणले असता, त्याला डिचोली कोर्टात उभे केले असता, या न्यायालयाने संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हा सायबर फसवणुकीचा प्रकार मे ते ९ जून २०२५ दरम्यान घडला होता. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवीमधील फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयित अलोक कुमार (१९) याला अटक केली. संशयिताने फिर्यादीला नॅचरल या आईस्क्रीमची फ्रँचायझी मिळवून देतो, असे सांगितले.

त्यानुसार, फिर्यादीस ४ लाख २४ हजार ९०० रुपये नोंदणी, सुरक्षा व सॉफ्टवेअर शुल्क स्वरुपात पैसे दोन बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने पैसे ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा केले. यावर संशयिताने फिर्यादीस संबंधित फ्राँचायझीची खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिले.

कालांतराने, संशयिताने फिर्यादीकडून आणखी पैशांची मागणी केली, तसेच त्याने फिर्यादीस फ्रॅंचायझीही दिली नाही. याप्रकरणी फिर्यादीने कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली असता, पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.

त्यानुसार, कोलवाळ पोलिसांनी शिताफिने व तांत्रिक देखरेखीच्या आधारे, अलोक कुमार (१९) याला पटना, बिहारमधून ताब्यात घेत अटक केली. दरम्यान, या संशयिताने देशातील इतर पाच ठिकाणी अशाच पद्धतीने इतरांची तब्बल २२.२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT