Women's Premier League गोव्याची युवा फलंदाज इब्तिसाम शेख हिची जिगरबाज नाबाद अर्धशतकी खेळी रविवारी रात्री ‘मॅचविनिंग’ ठरली. तिच्या 53 चेंडूंतील नाबाद 54 धावांच्या बळावर गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जीनो ड्रॅगन्सने व्हेंचर इलेव्हनवर पाच विकेट व एक चेंडू राखून मात केली.
पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील आणखी एका सामन्यात एमसीसी संघाने पणजी जिमखान्याला सहा विकेट राखून हरविले. पणजी जिमखान्याचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. काल त्यांना सेलेस्त सुपरवूमन्सने नमविले होते. चार षटकांत फक्त 16 धावा देत 4 गडी बाद करणारी बडोद्याची तन्वीर शेख एमसीसीच्या विजयाची शिल्पकार ठरली.
रंगतदार लढतीत इब्तिसामची छाप
मध्य प्रदेशच्या तमन्ना निगम हिच्या 52 चेंडूंतील झंझावाती नाबाद 74 धावांच्या बळावर व्हेंचर इलेव्हनने 5 बाद 145 धावा केल्या. त्यानंतर जीनो संघाची विजयाची दिशेने वाटचाल सुरू होती.
त्यांना अखेरच्या दोन षटकांत नऊ धावांची गरज होती, मात्र अंतिमपूर्व षटकांत तरन्नुम पठाण हिने फक्त दोन धावा दिल्याने उत्कंठा वाढली.
अखेरच्या षटकात विजयासाठी सात धावा हव्या असताना तमन्ना निगमच्या पहिल्याच चेंडूवर इब्तिसामने चौकार लगावून अर्धशतक पूर्ण केले आणि जीनोचा विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक
पणजी जिमखाना: 20 षटकांत 9 बाद 94 (रेषा कोरगावकर 28, तेजल हसबनीस 21, तन्वीर शेख 4-16, सिद्धी सवासे 2-7) पराभूत वि. एमसीसी ः 18 षटकांत 4 बाद 96 (गौतमी नाईक 19, सुनंदा येत्रेकर20, तन्वीर शेख नाबाद 12, दिव्या नाईक नाबाद 11, पूनम खेमनार 2-19).
व्हेंचर इलेव्हन: 20 षटकांत 5 बाद 145 (तमन्ना निगम नाबाद 74, तरन्नुम पठाण 31) पराभूत वि. जीनो ड्रॅगन्स ः 19.5 षटकांत 5 बाद 146 (किरण नवगिरे 14, इब्तिसाम शेख नाबाद 54, मिताली गवंडर 37, अनुजा पाटील 17).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.