Goa Illeagal Sand Mining: चापोरा नदीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कोलवाळ पोलिसांची कारवाई

या कारवाईत एक ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Goa Sand Mining
Goa Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Illeagal Sand Mining: बार्देझ, कामुर्ली येथील चापोरा नदी पात्राच्या कॅनोमधून अवैध वाळू उपशावर कोलवाळ पोलिसांनी छापा टाकला असून या कारवाईत एक ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

चापोरा नदी पात्राच्या कॅनोमधून अवैध वाळू उत्खनन सुरु असल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना प्राप्त झाली होती.

त्यानुसार श्याम सावंत, सहाय्यक भूवैज्ञानिक, खाण विभाग आणि भूवैज्ञानिक यांच्याशी संपर्क साधून बारदेझ तालुक्याचे प्रभारी ममतलदार, बंदर कर्मचारी कॅप्टन, शिवोली कोस्टल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला.

Goa Sand Mining
National Senior Women's Football: गोवा गोलबरोबरीसह स्पर्धेबाहेर

या छाप्यादरम्यान वाळूने अर्धा भरलेला एक निळ्या रंगाचा ट्रक (नोंदणी क्रमांक GA 01 Z 3599) आणि 8 घनमीटर अवैधरित्या काढलेली नदीतील वाळू आदी मुद्देमाल सापडून आला.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कॅनोमध्ये भरलेली नदीची वाळू पुन्हा चापोरा नदीत टाकून विल्हेवाट लावण्यात आली.

Goa Sand Mining
Goa Crime: जेसीबी चोरीप्रकरणी तिघांना अटक

सुशांत एच. सांगोडकर, कोलवले P.S चे PSI सत्यवान नाईक, PSI कोस्टल P.S. यांचा समावेश असलेल्या टीममध्ये म्हापसा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली सुनील पडवळ, रोबोट स्टाफचे ASI, संदिप मलिक, PC Colvale P.S, अजय गावडे, PC Colvale P.S श्री नीलेश मांद्रेकर आदींनी या मोहिमेत भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com