साखळी: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम अस्तित्वात असताना त्या राज्यात किती बिकट परिस्थिती होती याचे कथन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका प्रसंगातून केले आहे. २०१३ साली जम्मू काश्मीरमध्ये गेलो असता बॅगेत तिरंगा असल्याने अटक करण्यात आल्याची आठवण मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितली. तसेच, नेहरुंमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास विलंब झाल्याची टीका त्यांनी केली.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने साखळीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. फाळणीनंतर धर्माच्या आधारावर भारताचे दोन भाग करण्यात आले. पाकिस्तान आणि भारत अशी विभागणी झालेल्या देशात जम्मू काश्मीर वेगळा प्रदेश ठेवण्यात आला व त्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. जम्मू काश्मीरच्या विशेष राज्याच्या दर्जामुळे नाराज असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नेहरुंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मुखर्जी जम्मू काश्मीरमध्ये गेले असता त्यांना अटक करुन बंदीवासात ठेवण्यात आले, येथेच त्यांचा गूढ मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी देखील करण्यात आली नाही, असे सावंत यांनी नमूद केले. मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर एका देशात दो विधान, दो प्रधान आणि दोन निशाण चालणार नाहीत, अशी घोषणा उदयास आली. आणि अखेर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी मुखर्जी यांचे स्वप्न साकार केले आणि जम्मू काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, असे सावंत म्हणाले.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम अस्तित्वात असताना काय स्थिती होती याचे उदाहरण देताना मुख्यमंत्री सावंत यांनी एक आठवण सांगितली. २०१३ साली जम्मू काश्मीरमध्ये गेले असता आमच्या बॅगेत तिरंगा असल्याने अटक करण्यात आली होती, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. लाल चौकात तिरंगा फडविण्यासाठी गेले असती ही घटना घडल्याचे सावंत यांनी नमूद केले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताच्या स्वप्नासाठी बलिदान दिल्याचे सावंत यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.