Laxmikant Parsekar  Dainik Gomantak
गोवा

'गोव्‍यात भाजपचे रोपटे लावून जपले, तरीही माझ्‍यावर अन्‍याय'

मांद्रेसाठी आपणाकडे विकासाचा कोणता आराखडा आहे? यावर लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणतात..

दैनिक गोमन्तक

लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी गोव्‍यात 32 वर्षे भाजपचे रोपटे वाढवले, सांभाळले व सत्तेपर्यंतसुद्धा नेले. मात्र 2017 च्या पराभवानंतर दुर्लक्षित करून अडगळीत टाकल्‍यानंतर त्‍यांनी यावेळी निवडणुकीत भाजपसमोर खडे आव्हान उभे केले आहे. मूळ कार्यकर्त्यांची साथ व मतदारसंघात मिळत असलेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्‍चित असल्‍याचा विश्‍‍वास त्‍यांनी वेळोवेळी व्‍यक्त केला आहे. दै.‘गोमन्‍तक’ला त्‍यांनी दिलेली ही खास मुलाखत दिली.

यंदाच्या निवडणुकीस सामोरे जाताना मतदारांकडून नेमका काय अनुभव येतोय?

गेली 32 वर्षे भाजपचे रोपटे वाढविताना कष्ट व अपार मेहनत घेतल्याचे समाधान मिळते. यंदाच्या निवडणुकीत (Election) आपणास पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रह व निर्धारामुळे स्वतंत्र उमेदवारी जाहीर करावी लागली. यामागची पार्श्वभूमी मतदारांना पटली आहे. एक वेगळे वातावरण मांद्रे मतदारसंघात जाणवू लागले असून मतदार इतिहास रचणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. घरोघरी जाताना प्रत्येक घरात आपले स्वागत होते.

गेल्या पाच वर्षांचे विश्लेषण नेमके कसे कराल?

गेली पाच वर्षे मांद्रे मतदारसंघात विकास न झाल्याने जनता नाराज आहे. मतदारसंघाचे नेतृत्व करताना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न पाहिजे होते. पाणी, वीज, आरोग्य, रस्ते व साधनसुविधांबाबतीत दुर्लक्ष केल्याने मतदारांत चीड असल्याचे दिसून येते. ज्‍या कामांची उद्‌घाटने केली ती सर्व आपल्या कार्यकाळातील आहेत. त्याबद्दल आपला आक्षेप नाही. त्यांचा अधिकार साहजिकच येतो. मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधीने अमुक एक काम आपण पाच वर्षांत पूर्ण केले हे जनतेला सांगावे. एकही नाही. आपले आव्हान आहे. दमदाटी व दबावाचे राजकारण (Politics) मांद्रे मतदारसंघात (Constituency) चालू देणार नाही.

मतदारसंघातील प्रकल्‍पांबाबत काय सांगाल?

मांद्रे मतदारसंघातील नऊही पंचायत क्षेत्रांत पाणी समस्या तीव्रतेने जाणवत आहे. मात्र लोकप्रतिनिधीनी ढुंकूनही पाहिले नाही. आपण मार्गी लावलेले काम गेल्या दीड वर्षांत पूर्ण व्हायला हवे होते, पण ते तसूभरही पुढे गेले नाही. तुये पठारावरील 30 एमएलडी प्रकल्प आपल्या काळात मंजूर झाला होतो, तोही प्रलंबित आहे. 52 कोटींचे तुये इस्पितळ बांधून तयार आहे, पण त्‍या योग्‍य उपयोग रुग्‍णांना करून देण्‍यात लोकप्रतिनिधी उपयशी ठरले आहेत. सर्व कामे अपूर्ण स्‍थितीत आहेत.

मांद्रेसाठी आपणाकडे विकासाचा कोणता आराखडा आहे?

मांद्रे मतदारसंघ व पर्यायाने पेडणे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दूरदृष्टीने आपली पावले आश्वासक होती. दुर्दैवाने 2017 साली पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या पराभवामुळे तालुक्याचा विकास खुंटला. पुढील 25 वर्षांसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार केला होता व त्यादृष्टीने आपली पावले होती. पाणी, वीज, आरोग्य व रोजगाराच्या संधी याबाबत आपण जनतेच्‍या व्यथा ऐकल्या होत्या.

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी तालुक्यातच रोजगार संधी मिळाल्यास स्थलांतरीत होण्याची संख्या कमी होईल, शिवाय कुटुंबासाठी ते फायदेशीर ठरले असते. पण आमदार बदलला आणि विकास खुंटला. अजूनही संधी गेलेली नाही. लोकांनी पुन्‍हा निवडून दिल्‍यास विकासाचा आराखडा निश्‍चितच अमलात आणेन. माझ्‍या डोक्‍यात तो तयारही आहे.

भाजपबद्दल आपले काय मत?

यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला (BJP) संधी देऊन पुन्हा चूक करू नये असे आपणास वाटते. त्यांना संधी दिल्यास मांद्रे व पेडणे तालुका मागासच राहण्याची शक्यता आहे. आपल्‍या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत चालू केलेली कामे

पुढे नेण्याचे सौजन्य न दाखविल्याने मतदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. चालू केलेले वा चालू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळ का दिला नाही, याचा जाब जनतेला द्यावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT