Rajendra Arlekar
Rajendra Arlekar Dainik Gomantak 
गोवा

मी यापुढे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही: राजेंद्र आर्लेकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोव्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यास यापुढे आपण इच्छुक नसल्याचे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी स्पष्ट केले. पेडणे तालुका गोव्यात उच्चस्तरावर असावा ही आपली मनापासूनची इच्छा असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत क्षेत्रीय सुविधा केंद्र पश्चिम विभाग वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शारदा उच्च माध्यमिक विद्यालय, वझरी यांच्या सहयोगाने औषधी वनस्पतींची लागवड आणि त्याची शेती याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या‌ उद्‌घाटन‌‌ सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

वन्स देवी मंदिर, नागझर येथे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी जर स्वतःची जमीन असेल, तर शेती पिकवून जास्त कमवता येईल. त्यासाठी शेती करण्याची आपणास आवड असायला हवी. गोव्यात अनेक औषधी वनस्पती सापडतात, परंतु त्यांचा योग्य उपयोग काय असतो हे अनेक लोकांना माहीत नसते. अशा वनस्पती आपण मोठ्या प्रमाणात लागवड करून औषधासाठी जर पुरविल्या तर ते उदरनिर्वाहाचे साधन बनेल. हिमाचल प्रदेशात अनेक सुशिक्षित युवा पिढी शेतीकडे वळलेली आहे. शेतीबद्दलचे योग्य ज्ञान युवा पिढीला मिळावे याच हेतूने शारदा उच्च माध्यमिक विद्यालयात शेती हा विषय उपलब्ध करून दिला असल्याचे आर्लेकर म्हणाले.

या शिबिरात अनेक पुरुष व महिला शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच युवा वर्गाने देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली होती. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे शारदा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन मराठे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT