Adv Pratima Coutinho Dainik Gomantak
गोवा

Adv Pratima Coutinho: मला पद नको, गोव्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लढा देणार

Adv Pratima Coutinho: ॲड. प्रतिमा कुतिन्हो: काँग्रेस सोडणे ही माझी राजकीय चूक

दैनिक गोमन्तक

Adv Pratima Coutinho: मला कोणत्याच पदाची अपेक्षा नाही, परंतु मला गोव्यासाठी गोव्यातील म्हादई, व्याघ्र संरक्षण क्षेत्र यासाठी काम करायचे आहे. दिल्ली मॉडेलनुसार गोव्याचे प्रश्‍न हाताळता येणार नाहीत. स्थानिक प्रश्‍नांसाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे मत ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केले.

ते गोमन्तक टीव्हीवरील संपादक संचालक राजू नायक यांनी ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ॲड. कुतिन्हो म्हणाल्या, ज्यावेळी आप पक्षात होते त्यावेळी त्यांनी मला सन्मानाने वागवले, परंतु मी तेथे आनंदी नव्हते. मी आतून अस्वस्थ होते. त्यामुळे माझ्या आंतर मनातील हुंकाराचे ऐकून मी आम आदमी पक्ष सोडला. मी कोणत्या पक्षात आहे, यावरून माझी ओळख नसून माझ्या कार्यामुळे लोक मला ओळखतात.

मी मागील २८ वर्षे राजकारणात आहे. मी जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढा दिला आहे. रस्त्यावर सिलिंडर घेऊन, कांद्याच्या माळा गळ्यात घालून लढा दिला आहे, परंतु आपमध्ये तसे सक्रिय कार्य दिसून येत नाही. जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर कोणी उतरत नसल्याने मी पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले.

...त्यामुळेच मी दुखावले

ज्यावेळी मी काँग्रेस पक्षात होते, त्यावेळी मला आकस्मिकपणे निवडणुकीला दहा बारा दिवस असताना जिल्हा पंचायत निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली. खरे तर मी जिल्हा पंचायतीसाठी इच्छुक नव्हते, परंतु त्यावेळी मला दिगंबर कामत व लुईझिन फालेरो यांनी वाऱ्यावर सोडले. त्यांनी मला साथ दिली नाही.

त्यामुळे मी दुखावले व कोणताही विचार न करता राजीनामा दिला. काळाचा फेरा बघा, आज हे काँग्रेस संपविणारे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये नाहीत. त्यावेळी मी दिलेला राजीनामा ही माझी राजकीय चूक होती, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Goa Assembly Live: १७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

Goa Politics: खरी कुजबुज; अन्‍यथा विजय पत्रकार झाले असते!

SCROLL FOR NEXT