Vijai Sardesai Janata Darbar In Margao Dainik Gomantak
गोवा

Margao: 'मला फरक नाही पडत', सरदेसाईंच्या जनता दरबारावर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Vijai Sardesai Janata Darbar In Margao: सरदेसाई यांच्या मडगाव येथील जनता दरबाराला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव नगरपालिकेतील ‘जनता दरबार’ घेऊन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच ‘मडगावात येऊन कुणीही कितीही सभा घेतल्या तरी मला काहीच फरक पडत नाही’ असे कामत यांनी म्‍हटले आहे.

मडगावात येऊन सभा किंवा बैठका घेण्यास मी कुणालाही अडवू शकत नाही. मडगावातील मतदारांवर माझा पूर्ण विश्‍‍वास आहे. मतदार आपल्‍याला काय पाहिजे ते करतील. मी सर्व त्यांच्यावर सोडून दिले, आहे कामत म्हणाले.

दरम्‍यान, मडगाव मतदारसंघातून सलग आठवेळा निवडून येण्याचा पराक्रम केलेले दिगंबर कामत यांचे नाव न घेता विजय सरदेसाई यांनी ‘मडगाव कोलमडू लागले आहे, येथील विकासकामांचे प्राधान्यक्रम चुकीचे आहेत’ अशी टीका केली होती.

कोणाला काय म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू द्या. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. माझ्या मतदारांना काय हवे आहे याची मला जाणीव आहे. मी त्यांना हवे तेच निर्णय घेतलेले आहेत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT