Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Vijai Sardesai In Margao: पालिकेत एकत्र आलेले कामत आणि सरदेसाई आता राजकीय विरोधक बनले आहेत.
दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या
Vijai Sardesai Janata Darbar In MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

आमदार विजय सरदेसाई यांनी 'गोवा फॉरवर्ड'च्या विस्तारासाठी मडगावला प्राधान्य दिल्याचे आता लपून राहिलेले नाही. आज सरदेसाई यांच्या मडगाव येथील जनता दरबाराला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 200 हून अधिक लोकांची उपस्थिती होती.

मडगावसह सासष्टीतील विविध भागांतील लोकांनी प्रश्न मांडले. चढाओढीच्या राजकारणात विजय यांनी टाकलेले हे पुढचे पाऊल आमदार दिगंबर कामत यांची चिंता वाढवणारे आहे जनता दरबारानंतर सरदेसाई यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे लोकांनी आपल्या समस्या मांडल्या, त्या पाहता मडगाव कोसळत आहे.

सर्व मडगावकरांनी एकत्र येऊन ते सांभाळण्याची गरज आहे. युतीच्या निमित्ताने कधीकाळी पालिकेत एकत्र आलेले कामत आणि सरदेसाई आता राजकीय विरोधक बनले आहेत.

दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या
Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

फातोर्डा मतदारसंघाचे आमदार असून, सरदेसाई यांनी मागील वर्षभर मडगावात लक्ष केंद्रीत केले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत ते मडगावातून रिंगणात असतील, अशीही अटकळ आहे.

मडगावात जनता दरबार घेण्याचे सरदेसाई यांनी जाहीर केल्यानंतर तो होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. तसा गोवा फॉरवर्डने आरोप केला होता. मात्र, नंतर आवश्यक त्या परवानगी मिळाल्या. आजच्या जनता दरबारात विविध प्रकारच्या समस्या मांडण्यात आल्या.

अधिवेशनात प्रश्न विचारणार

जनता दरबारात लोकांनी ज्या समस्या मांडल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून येत्या विधानसभा अधिवेशनात आपण या संदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com