Ranbir Kapoor 
गोवा

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Masterclass And In-Conversation At IFFI Goa 2024: काही शॉर्ट फिल्म्समध्ये केलेले काम अतिशय सुमार दर्जाचे असल्याने त्या फिल्म्स लपवून ठेवल्याचेही रणबीरने सांगितले.

Pramod Yadav

Ranbir Kapoor Master Class At IFFI Goa 2024

पणजी: बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरने रविवारी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हजेरी लावली. इफ्फीच्या मास्टरक्लासमध्ये रणबीरने आजोबा राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. रणबीरने या मुलाखतीत सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. अभिनयाच्या सुरवातीच्या दिवसात केलेल्या शॉर्टफिल्ममधील कामाबाबत रणबीरने यावेळी मोठा खुलासा केला.

'शो मॅन' राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूरला इफ्फीतील मास्टरक्लासमध्ये (Ranbir Kapoor Masterclass At Iffi Goa 2024) आमंत्रित करण्यात आले होते. रणबीरने राज कपूर यांच्या बॉलीवूडमधील योगदानावर भाष्य करताना मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली.

रणबीरने यावेळी आलिया कपूरला किशोर कुमार कोण आहेत माहिती नव्हते, असे सांगितले. तिने याबाबत रणबीरला विचारणा केल्याचा खुलासा यावेळी त्याने मुलाखतीत केला.

रणबीरने यावेळी त्याला काही गोष्टींची लाज वाटत असल्याचे सांगितले. सुरुवातीच्या दिवसात रणबीर काही शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. पण, या फिल्म्समध्ये केलेल्या कामाची त्याला लाज वाटत असल्याचे त्याने सांगितले. या फिल्म्समध्ये त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे असल्याने त्या फिल्म्स मी लपवून ठेवल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

लेकीला आजोबांचे गाणे पहिल्यांदा ऐकवले

किसी कि मुस्कुराहटों पे हो निसार... या राज कपूर यांच्या आयकॉनिक गाण्याच्या काही ओळी यावेळी रणबीर कपूरने गुणगूणल्या. माझ्या लेकीला देखील मी हेच गाणे पहिल्यांदा ऐकवले, असे रणबीर म्हणाला.

रणबीर कपूरने मास्टरक्लासमध्ये राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज यांचे बॉलीवूडमधील योगदान, बालपण आणि अभिनय कौशल्य यावर रणबीरने भाष्य केले. मुलाखतीनंतर त्याने प्रेक्षकांच्या काही प्रश्नांची देखील उत्तरे देत मने जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT