SpiceJet Dainik Gomantak
गोवा

SpiceJet Emergency Landing: गोव्याहून येणाऱ्या स्पाईसजेट विमानाचे हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

स्पाइसजेटच्या एसजी 3735 विमानाच्या पायलटला विमानातून धूर येत असल्याचे दिसले, त्यानंतर लगेचच हवाई वाहतूक नियंत्रकाला माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

स्पाईसजेटच्या (SpiceJet) विमानाचे इमर्जन्सी लँडिंग पुन्हा एकदा करण्यात आले आहे. गोव्यातून (Goa) उड्डाण केलेल्या या विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. स्पाइसजेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइस जेटचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले."

स्पाइसजेटच्या एसजी 3735 विमानाच्या पायलटला विमानातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (ATC) माहिती दिली. यानंतर, ग्राउंड स्टाफला घाईघाईने सतर्क करण्यात आले. बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

विमानात ८६ प्रवासी होते
विमानतळाच्या एका सूत्राने IANS ने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "बोर्डात ८६ प्रवासी होते. सर्व सुरक्षित आहेत." गोव्याहून रात्री ९.५५ वाजता विमानाने उड्डाण केले आणि हैदराबादमध्ये रात्री ११.३० वाजता नियोजित लँडिंगपूर्वी वैमानिकाला कॉकपिटमध्ये धूर दिसला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून धुरामुळे एक महिला प्रवाशी आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे नऊ उड्डाणे इतर शहरांकडे वळवावी लागली. सहा देशांतर्गत उड्डाणे, दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि एक मालवाहू उड्डाण वळवण्यात आले.

यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
याआधीही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. गेल्या महिन्यात 26 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच पक्ष्याला धडक दिली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Goa Court: गोव्यात अडीच वर्षांत 9727 खटले निकाली! फास्‍ट ट्रॅक कोर्टात 1504 खटले प्रलंबित

Goa Assmbly Live: जुने गोवेतील चर्चमध्ये 'ड्रेसकोड'ची सक्ती हवी!

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT