Hyderabad Drug Case Dainik Gomantak
गोवा

Drug Case: हैदराबादमध्ये मोठ्या ड्रग रॅकेटचा भांडाफोड, युवा उद्योगपतीला अटक; गोवा कनेक्शन उघड

Hyderabad Drug Case: संशयित करण हा संतोष घांडव उर्फ रामकी नावाच्या गोव्यातील व्यक्तीकडून अमली पदार्थ विकत घेत होता.

Pramod Yadav

हैदराबादमध्ये मोठ्या ड्रग रॅकेटचा भांडाभोड करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या रंगा रेड्डी युनिटच्या वतीने मंगळवारी (२७ मे) ही कारवाई करण्यात आली. विभागाने बेगमपेठ येथून युवा उद्योगपतीला अटक केली असून, या प्रकरणाचे गोवा कनेक्शन उघड झाले आहे.

करण परमार (वय ३२, बेगमपेठ) असे अटक करण्यात आलेल्या युवा उद्योजकाचे नाव आहे. परमार गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ओळखीच्या लोकांना कोकेन आणि ओजी कुश यासारख्या अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्याकडे १९.३६ ग्रॅम कोकेन आणि ६.७ ग्रॅम ओजी कुश अमली पदार्थ जप्त केला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जीवन किरण यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली आहे. संशयित करण हा संतोष घांडव उर्फ रामकी नावाच्या गोव्यातील व्यक्तीकडून अमली पदार्थ विकत घेत होता. त्यानंतर करण ओळखीच्या लोकांना त्याची विक्री करायचा. १० ते १५ हजार प्रति ग्रॅम दराने तो त्याची विक्री करायचा, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संशयित करण याचा आणि त्याने अमली पदार्थ विक्रीचा व्यवहार केलेल्या सर्व ग्राहकांचे कॉल डेटा रेकॉर्ड तपासला जात आहे. विभागाने संशयित करण आणि जप्त करण्यात आलेले अमली पदार्थांचा साठा बालानगर पोलिसांच्याकडे स्वाधीन केला आहे. बालानगर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT