Bus accident  Dainik Gomantak
गोवा

वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी बस अपघातात चिमुकल्याचा करुण अंत

गोव्याहून हैदराबादकडे निघालेली खासगी बसचा अपघात; 7 मृत तर अनेक जखमी

दैनिक गोमन्तक

पणजी : शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास गोव्याहून हैदराबादकडे निघालेली खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक झाली. धडकेने बस पुलावर आदळली आणि तिने अचानक पेट घेतला. परिणामी सर्व प्रवाशी बसमध्येच अडकले. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला, पण काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. बसमध्ये तेलंगणाचे 35 प्रवासी होते. या अपघातात 2 वर्षीय विवानचा करूण अंत झाला. (Hyderabad bus accident goa)

या बसमध्ये अर्जुन आणि सरलादेवी हे आपल्या कुटुंबातील 30 सदस्य, मित्र आणि शेजाऱ्यांसह आपला मुलगा विवान याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 29 मे रोजी गोव्यात आले होते आणि 2 जून रोजी संध्याकाळी ते गोव्याहून परतीच्या मार्गावर होते. पण परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला विवान अपघाताला बळी पडला.

अर्जुन (वय 34), सरलादेवी अर्जुन (32), विवान अर्जुन (2 वर्षे), शिवकुमार (35), रावली शिवकुमार (30), दीक्षित शिवकुमार (9 वर्षे) आणि अनिता राजू (40) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. ते सर्वजण तेलंगणातील सिकंदराबाद येथील रहिवासी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT