ferry boat  Dainik Gomantak
गोवा

...म्हणून गोव्यात हायब्रिड फेरीबोट लांबणीवर

मोटर आणि तंत्रज्ञ इटलीतून येण्यास विलंब लागत असल्याने लोकार्पणासाठी उशीर

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील पहिल्या सोलर हायब्रिड फेरीबोटसाठी गोमंतकीयांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. फेरीबोटचं व्यावसायिक तत्वावर लोकार्पण काही कारणांमुळे लांबणीवर पडल्याची माहिती आहे. कोरोना परिस्थितीमुळे बोटीच्या काही पार्ट्सची जोडणी शिल्लक असल्याचं समोर आलं आहे.

या बोटची चाचणी काही दिवसांपूर्वीच बंदरकप्तान विभागाकडून झाली होती, मात्र या बोटीसाठी लागणारी इलेक्ट्रिक मोटर इटलीहून मागवण्यात आली होती. राज्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केल्यामुळे बोटीसाठी लागणारी मोटर आणि अन्य उपकरणं येण्यास विलंब झाला आहे. बोटीमध्ये ही मोटर आणि अन्य उपकरणं न बसवल्यामुळे हायब्रिड फेरीबोट प्रवाशांच्या सेवेत येण्यास उशीर होत आहे.

फेरीबोटमध्ये ही मोटर जोडण्यासाठी इटलीहून इंजिनिअर आणि तंत्रज्ञ गोव्यात येणार होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ते एप्रिल महिन्यापर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच ही मोटरही इटलीहून येणार असल्याने फेरीबोटच्या प्रत्यक्ष कार्यरत होण्यास विलंब लागणार आहे. ही इलेक्ट्रिक कम सोलर फेरीबोट दिवारमधील अॅक्वेरीअस शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच मोटर इटलीतून (Italy) मागवण्यात आली आहे. 2018 मध्ये गोव्यातील पथकाने केरळमध्ये जात अशा प्रकारच्या फेरीबोटची पाहणी केली होती. त्यानंतर गोव्यात (Goa) प्रायोगिक तत्वावर अशी फेरीबोट आणण्याचा विचार सुरु करण्यात आला होता.

इटलीहून मागवलेली ही मोटर पूर्णपणे इलेक्ट्रिक असून गोव्यातील पहिलीच मोटर असेल जी फेरीबोटमध्ये बसवण्यात येईल. तसंच याची बॅटरी चार्ज होण्यासही खूप वेळ लागतो. त्यामुळे सोलर (Solar) हायब्रिड फेरी चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या जरी या फेरीसाठी विलंब होत असला तरीही यापुढे फेरीसाठी लागणारे पार्ट साठवून ठेवले जाणार आहेत. ज्यामुळे पुन्हा काही अडचण आल्यास इटलीतील इंजिनिअर्सवर विसंबून न राहता इथल्या इथे दुरुस्ती केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT