Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: डोक्यात दगड घालून पत्नीचा खून, पती गोवा वीज खात्यात कार्यरत; दोघांना अटक

मयत महिला विशीता नाईक सोमवार रात्रीपासून बेपत्ता होती.

Pramod Yadav

Goa Murder Case: डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना दोडामार्ग येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोवा वीज खात्यात कार्यरत असलेला तिचा पती आणि त्याच्या साथिदाराला अटक करण्यात आली आहे.

(Husband Kills Wife In Goa)

विशीता नाईक (वय 35, रा. म्हापसा- गोवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती विनोद मनोहर नाईक (मुळ रा. वास्को, सध्या म्हापसा) व ऋतुराज श्रावण इंगवले (मुळ रा. चंदगड-कोल्हापूर, सध्या म्हापसा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला विशीता नाईक सोमवार रात्रीपासून बेपत्ता होती. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील तिळारीजळच्या भटवाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला आहे. गेले अनेक दिवस पती-पत्नीत वाद होते. त्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अज्ञात व्यक्तीला पाळये येथे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एका नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यानुसार त्यांनी पतीसह त्याच्या साथिदाराला ताब्यात घेतले. चौकशीअंती दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपी पतीने फिरायला जाऊया असे सांगून पत्नीला दोडामार्ग-पाळये येथे घेऊन गेला. जेवण झाल्यानंतर दोघांमध्ये वादानंतर भांडण झाले. प्रथम तिचा कपड्याच्या साह्याने गळा आवळला नंतर तिला फरफटत नेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत खून केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

Crime News: घरातच बनवली 'स्मशानभूमी'! आई-वडिलांना मारुन मुलानं घरातच गाडलं; बहिणीच्या प्रेमप्रकरणातून संपवलं संपूर्ण कुटुंब

SCROLL FOR NEXT