suicide due to domestic issues Dainik Gomantak
गोवा

"माझ्या आत्महत्येला पत्नीच जबाबदार" मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिट्ठीतून केला धक्कादायक खुलासा

mental harassment in marriage: तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली

Akshata Chhatre

बेळगाव: बेळगावच्या अनगोळमधील शिवशक्ती कॉलनीत शुक्रवारी (दि.३० मे) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सुनील मुळेमणी (वय ३३) या तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक तणावाचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचे हे एक दुर्दैवी उदाहरण समोर आले आहे.

आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत 'पत्नीच जबाबदार'

सुनील मुळेमणी हे अनगोळमधील श्रीराम कॉलनीतील रहिवासी होते. काही काळापासून ते आपली पत्नी आणि मुलीपासून वेगळे राहत होते. ते कंप्युटर दुरुस्तीचा व्यवसाय करत होते आणि शिवशक्ती कॉलनीत त्यांनी भाड्याने दुकान घेतले होते. शुक्रवारी (दि.३० मे) रोजी सकाळी त्यांनी आपल्या याच दुकानात वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

या घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास करत असताना पोलिसांना आत्महत्येपूर्वी सुनीलने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली.

या चिठ्ठीत त्याने स्पष्ट शब्दांत, "My wife is the reason for my suicide" (माझ्या आत्महत्येचे कारण माझी पत्नी आहे) असे लिहिले होते. या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वैवाहिक संबंधातील तणाव आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न किती गंभीर रूप धारण करू शकतात, हे यातून दिसून येते. उद्यमबाग पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून, चिठ्ठीतील तपशिलांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

SCROLL FOR NEXT